'नरेंद्र मोदी कधीही सूडाचं राजकारण करत नाहीत'- देवेंद्र फडणवीस

राज्यात सुरु असलेल्या ईडीच्या कारवाईवरुन सत्ताधारी नेत्यांच्या आरोपांना उत्तर

Updated: Mar 23, 2022, 05:47 PM IST
'नरेंद्र मोदी कधीही सूडाचं राजकारण करत नाहीत'- देवेंद्र फडणवीस  title=

नागपूर : राज्यात महाविकास आघाडीतले (Mahavikas Aghadi Government) अनेक नेते सध्या ईडीच्या (ED) रडारवर आहेत. यावर सत्ताधारी नेत्यांनी भाजपवर (BJP) निशाणा साधला आहे. भाजप ईडीच्या माध्यमातन सूडबुद्धीने ही कारवाई करत असल्याचं सत्ताधारी नेत्यांचं म्हणणं आहे.

यावर विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांनी उत्तर दिलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) कधीच सूडाचं राजकारण करत नाहीत, त्यांच्या राज्यात कोणतीही तपास यंत्रणा कधीही सूडाचं राजकारण करणार नाही असं फडणवीस यांनी म्हटलं आहे.

आरोप करणाऱ्या नेत्यांनी महाराष्ट्रातील परिस्थिती पाहिली पाहिजे, कशा प्रकारे प्रवीण दरेकर (Pravin Darekar) यांच्यावर कारवाई सुरु आहे, नसलेल्या गोष्टी कशा तयार होत आहेत, कशा प्रकारे आमच्या सर्वांविरुद्ध षडयंत्र यांचे वकील मंत्र्यांसोबत बसून तयार करतायत, असा आरोप फडणवीस यांनी केला आहे. 

केंद्र सरकार किंवा राज्य सरकार असेल कुणीही चुकीची कारवाई करु नये, योग्य तीच कारवाई झाली पाहिजे आणि मोदींच्या राज्यात चुकीची कारवाई होऊ शकत नाही असं देवेंद्र फडणवीस यानी स्पष्ट केलं.