भाजपकडून पंकजा मुंडे यांच्यासह महाराष्ट्रातील या नेत्यांवर मोठी जबाबदारी

 BJP's Lok Sabha Election Preparations : आगामी लोकसभा निवडणुकीची ( Lok Sabha Elections 2024) मोर्चेबांधणी करण्यासाठी भाजपकडून जोरदार तयारी करण्यात येत आहे. याचाच एक भाग म्हणून भाजपच्या संघटनात्मक नियुक्त्यांत महाराष्ट्रातल्या (Maharashtra) चार मुख्य नेत्यांना स्थान देण्यात आले आहे.  

Updated: Sep 10, 2022, 10:52 AM IST
भाजपकडून पंकजा मुंडे यांच्यासह महाराष्ट्रातील या नेत्यांवर मोठी जबाबदारी title=

मुंबई : BJP's Lok Sabha Election Preparations : आगामी लोकसभा निवडणुकीची ( Lok Sabha Elections 2024) मोर्चेबांधणी करण्यासाठी भाजपकडून जोरदार तयारी करण्यात येत आहे. याचाच एक भाग म्हणून भाजपच्या संघटनात्मक नियुक्त्यांत महाराष्ट्रातल्या (Maharashtra) चार मुख्य नेत्यांना स्थान देण्यात आले आहे. विनोद तावडे (Vinod Tawde), प्रकाश जावडेकर, विजया रहाटकर, पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांना राष्ट्रीय पातळीवर ही जबाबदारी सोपविण्यात आली आहे.

भाजपाने केंद्रीय पातळीवर काही राज्यांच्या प्रभारी आणि सहप्रभारींची नियुक्ती जाहीर केली आहे. यात महाराष्ट्रातील काही नेत्यांना मोठी जबाबदारी दिल्याचे पाहायला मिळाले आहे. विनोद तावडे यांना बिहारच्या प्रभारीपदाची जबाबदारी देण्यात आली आहे. तर पंकजा मुंडे यांना मध्यप्रदेशात सहप्रभारीपदाची आहे. याबाबतचे पत्रक भाजपाच्या केंद्रीय कार्यालयातून प्रसिद्ध करण्यात आले आहे. 

माजी केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनाही यात संधी मिळाली आहे. त्यांच्याकडे केरळच्या प्रभारीपदाची जबाबदारी सोपवण्यात आलेली आहे.  डाव्यांचा गड मानल्या जाणाऱ्या केरळच्या प्रभारीपदाची जबाबदारी ही माजी केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांच्यावर सोपवण्यात आली आहे. केंद्रीय मंत्रिपदावरून बाजुला सारल्यापासून प्रकाश जावडेकर हे फारसे सक्रिय नव्हते. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जगत प्रसाद नड्डा यांनी राज्यवार प्रभारी आणि सहप्रभारीपदी भाजप नेत्यांची निवड केली आहे. तर राज्य महिला आयोगाच्या माजी अध्यक्ष विजया रहाटकर यांच्यावर भाजपने राजस्थानच्या सहप्रभारीपदाची धुरा दिली आहे. 

दरम्यान, त्याआधी भाजपमध्ये वेगळ्या राज्यांमध्ये महत्वाची संघटनात्मक जबाबदारी काही नेत्यांकडे सोपवली होती. यात सर्वात महत्वाची जबाबदारी विनोद तावडे, पंकजा मुंडे, सुनील देवधर आणि विजया रहाटकरांचा समावेश आहे. या नेत्यांवर महत्वाच्या जबाबदाऱ्या सोपवताना विनोद तावडे यांची हरियाणा प्रदेश प्रभारीपदी नियुक्ती तर सुनील देवधर यांची आंध्रप्रदेश सहप्रभारी पदी नियुक्ती करण्यात आली होती. तसेच पंकजा मुंडे यांची मध्य प्रदेश सहप्रभारी पदी नियुक्ती होती. हीच नियुक्ती आता कायम ठेवण्यात आली आहे. तसेच विजया रहाटकर यांची दमन दीव - दादरा- नगर हवेली प्रभारीपदी नियुक्ती करण्यात आली होती.