मोठी राजकीय बातमी, पुढचा मुख्यमंत्री राष्ट्रवादीचाच असेल - धनंजय मुंडे

  Big political news : आताच्या क्षणाची मोठी राजकीय बातमी. पुढचा मुख्यमंत्री राष्ट्रवादीचाच (NCP) असेल, असे विधान राष्ट्रवादीचे नेते आणि मंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांनी केले.  

Updated: Jun 4, 2022, 10:22 AM IST
मोठी राजकीय बातमी, पुढचा मुख्यमंत्री राष्ट्रवादीचाच असेल - धनंजय मुंडे title=
संग्रहित छाया

सातारा :  Big political news : आताच्या क्षणाची मोठी राजकीय बातमी. पुढचा मुख्यमंत्री राष्ट्रवादीचाच (NCP) असेल, असे विधान राष्ट्रवादीचे नेते आणि मंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांनी केले. साताऱ्यातील सभेत धनंजय मुंडे बोलत होते. याआधी पुढचा मुख्यमंत्री राष्ट्रवादीचा होऊ दे, असे वक्तव्य राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केले होते. त्यामुळे आता धनंजय मुंडे यांनी विधान केल्याने राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरु झाली आहे.

राज्यात येणाऱ्या काळात मुख्यमंत्री राष्ट्रवादीचाच असेल, असे विधान सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य मंत्री धनंजय मुंडे यांनी केले. ते साताऱ्यातील डिस्कळ इथल्या एका सभेत बोलत होते. धनंजय मुंडे राष्ट्रवादीचे नेते शशिकांत शिंदे यांच्या मतदारसंघात आले आहेत. 

विविध विकासकामांच्या उदघाटनाबरोबर त्यांची खटाव तालुक्यातील डिस्कळ इथं झालेला शेतकरी मेळावा हा चांगलाच गाजला. यावेळी धनंजय मुंडे यांनी महाविकास आघाडीचेच घटक असलेल्या शिवसेनेच्या आमदारांवरही अप्रत्यक्ष टीका केली. यावेळी त्यांनी पुढच्या वेळी सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य मंत्री पदाचे खाते हे आपल्याकडेच असेल कारण पुढचा मुख्यमंत्री हा आपलाच असल्याचंही त्यांनी सांगितले.  

याआधी मुख्यमंत्री पदाबाबत खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या, पुढचा मुख्यमंत्री राष्ट्रवादीचा होऊ दे. आता धनंजय मुंडे म्हणतात, पुढचा मुख्यमंत्री आमचाच असणार. यावर काँग्रेसकडून प्रतिक्रिया आली आहे. महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी आपली प्रतिक्रिया देताना म्हटले की, प्रत्येकाला पक्ष वाढवण्याचा अधिकार आहे. आम्ही तिने पक्ष एकत्र असलो तरी प्रत्येकाला आपला पक्ष वाढवण्याची मुभा आहे.