पुणे : पुणेकरांसाठी आताची मोठी बातमी. पुण्यातील भोसरी, आकुर्डीमधील 60 हजार ग्राहकांचा वीजपुरवठा बंद झाला आहे. महापारेषण कंपनीच्या भोसरी इथल्या अतिउच्चदाब 220 केव्ही उपकेंद्रातील 100 एमव्हीए क्षमतेच्या पॉवर ट्रान्सफॉर्मरमध्ये सकाळी 6 वाजताच्या सुमारास बिघाड झाला.
त्यामुळे भोसरी आणि आकुर्डीमधील घरगुती, औद्योगिक ग्राहकांसह सुमारे 60 हजार ग्राहकांचा वीजपुरवठा सध्या बंद आहे. विजेच्या वाढत्या मागणीमुळे भारव्यवस्थापन शक्य होत नसल्याने पर्यायी वीजपुरवठ्याची सोय देखील उपलब्ध होऊ शकलेली नाही आहे.
मात्र, महापारेषणकडून या पॉवर ट्रान्सफॉर्मरमधील बिघाड शोधण्याचे काम जलदगतीने सुरु आहे. या कालावधीत वीजग्राहकांनी सहकार्य करावे असं आवाहन महापारेषण व महावितरण यांच्याकडून करण्यात आलंय.