शिक्षक आणि विद्यार्थ्यांसाठी आताची सर्वात मोठी बातमी

शिक्षण क्षेत्रातील आताची सर्वात मोठी बातमी आहे. शिक्षक आणि विद्यार्थ्यांसाठी ही बातमी फार महत्त्वाची आहे. 

Updated: Feb 8, 2022, 05:51 PM IST
शिक्षक आणि विद्यार्थ्यांसाठी आताची सर्वात मोठी बातमी title=

मुंबई : शिक्षण क्षेत्रातील आताची सर्वात मोठी बातमी आहे. शिक्षक आणि विद्यार्थ्यांसाठी ही बातमी फार महत्त्वाची आहे. कोरोनामुळे गेल्या पावणे दोन वर्षांत शाळा ऑनलाइन सुरू आहेत. त्यामुळे बऱ्याच विद्यार्थ्यांना नेमकं काय शिकवलं जातंय हे सामजण्यात अडचण येत आहेत. तर अनेकांची आर्थिक परिस्थिती नसल्याने शिक्षणापासून वंचित राहात आहेत. 

विद्यार्थ्यांचं नुकसान टाळण्यासाठी आता उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मोठं आवाहन केलं आहे. कोरोनामुळं शाळा बंद असल्यानं विद्यार्थ्यांची पावणे दोन वर्षं गेली. शिक्षकांनी शनिवार, रविवार शाळा सुरू ठेवून अभ्यासक्रम भरून काढला पाहिजे, असं आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवारांनी केलं. 

सोलापूर जिल्हा परिषदेच्या स्वच्छ शाळा, सुंदर शाळा उपक्रमाच्या पारितोषिक वितरण कार्यक्रमात ते बोलत होते. हा कार्यक्रम राज्यभरात राबवला गेला पाहिजे, असंही त्यांनी यावेळी सांगितलं. अजित पवार आणि राज्यमंत्री दत्तात्रय भरणे कार्यक्रमाला ऑनलाईन उपस्थित होते.

अजित पवारांनी शिक्षक आणि विद्यार्थ्यांना हे आवाहन केलं आहे. आता शिक्षणमंत्री यासंदर्भात काही निर्णय घेणार का? की स्थानिक पातळीवर शिक्षण विद्यार्थ्यांचं नुकसान होऊ नये म्हणून शनिवार रविवार शिकवून अभ्यासक्रम पूर्ण करणार हे पाहाणं गरजेचं ठरणार आहे.