बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी, शिक्षण मंडळाने केली 'ही' घोषणा

राज्यात 12 वी च्या परीक्षा 4 ते 30 मार्चदरम्यान होणार आहे, बारावीच्या परीक्षी ऑफलाईनच होणार आहेत, परीक्षेसाठी अर्धात तास जादा वेळ देण्यात आला आहे. 

Updated: Feb 8, 2022, 05:25 PM IST
बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी, शिक्षण मंडळाने केली 'ही' घोषणा title=

HSC EXAM : महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात येणाऱ्या बारावी परीक्षेबाबत विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. बारावी परीक्षांचं प्रवेशपत्र (hall ticket) उद्यापासून विद्यार्थ्यांना मिळणार आहे. 

ऑनलाईन पद्धतीने मंडळाच्या www.mahahssboard.in या संकेतस्थळावर उद्या दुपारी १ वाजल्यानंतर उपलब्ध होणारआहे. शाळा आणि कॉलेजकजून ऑनलाईन प्रवेशपत्र प्रिंट करुन दिली जाणार आहेत.

राज्यात 12 वी च्या परीक्षा 4 ते 30 मार्चदरम्यान होणार आहे. बारावीच्या परीक्षी ऑफलाईनच होणार आहेत. दोन वर्ष कोरोनामुळे विद्यार्थ्यांचा लेखन वेग कमी झाला आहे. हे लक्षात घेता परीक्षेसाठी अर्धात तास जादा वेळ देण्यात आला आहे. राज्यात बारावी परीक्षांसाठी १४,७२,५६४ आहेत.

शिक्षण मंडळाने ऑफलाईन परीक्षांची पूर्ण तयारी केली आहे. यासाठी पावणे दोन लाख कर्मचारी झटत आहेत. कोरोनाचा विचार करून आवश्यक काळजी घेतली जात असून झिग झॅक पद्धतीने ही परीक्षा घेण्यात येणार आहे. जेथे शाळा तेथेच परीक्षा होणार आहे. यामुळे मुलांच्या मनातील भीती कमी होईल. त्यांना चांगले वातावरण मिळेल, असं शिक्षण मंडळाचं म्हणणं आहे.