ओखी वादळामुळे रत्नागिरी किनारपट्टी भागात सर्वाधिक नुकसान

ओखी वादळामुळे रत्नागिरी जिल्ह्यातील किनारपट्टी भागात सर्वाधिक नुकसान झालं आहे. दापोलितल्या हर्णै, पाजपंढरी, मुरुड करजगाव तामसतीर्थ आणि लाडघर किनारपट्टीला याचा सर्वाधिक फटका बसला आहे. इथले लोक जीव मुठीत धरून राहत आहेत.

shailesh musale शैलेश मुसळे | Updated: Dec 6, 2017, 06:10 PM IST
ओखी वादळामुळे रत्नागिरी किनारपट्टी भागात सर्वाधिक नुकसान title=

रत्नागिरी : ओखी वादळामुळे रत्नागिरी जिल्ह्यातील किनारपट्टी भागात सर्वाधिक नुकसान झालं आहे. दापोलितल्या हर्णै, पाजपंढरी, मुरुड करजगाव तामसतीर्थ आणि लाडघर किनारपट्टीला याचा सर्वाधिक फटका बसला आहे. इथले लोक जीव मुठीत धरून राहत आहेत.

मुरुड किनारपट्टीवर अचानक पाणी भरपूर प्रमाणात वाढल्यामुळे ५ ते ६ टपऱ्या वाहून गेल्या. तर अनेक हॉटेल्समध्ये देखील पाणी घुसलं. तसंच किनाऱ्यालगत सुरुची झाडे उन्मळून पडली आहेत. बागांमध्ये देखील पाणी शिरलं. सालदुरेमध्ये तर किनारपट्टीलगतच्या घरांमध्ये अंगणापर्यंत पाणी शिरलं तर इकडे हर्णैमध्ये बंदर मोहल्ल्यामध्ये तसेच बंदरातदेखील तीच अवस्था होती वडापावची हातगाडी देखील वाहून गेली आहे. तसंच बहुतेक मच्छिमारांच्या जवळपास १०० छोट्या बोटी वाहून गेल्या आहेत त्यामुळे मच्छिमार बांधवांचे देखील प्रचंड नुकसान झालेले आहे.