१२ मुलांची धिंड : कंपनी व्यवस्थापकासह १० सुरक्षा रक्षकांवर गुन्हा

 अल्पवयीन मुलांची अर्धनग्न करून धिंड काढणाऱ्या १० सुरक्षा रक्षकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

Updated: Jan 12, 2019, 09:55 PM IST
१२ मुलांची धिंड : कंपनी व्यवस्थापकासह १० सुरक्षा रक्षकांवर गुन्हा title=

भंडारा : तुमसरमध्ये अल्पवयीन मुलांची अर्धनग्न करून धिंड काढणाऱ्या १० सुरक्षा रक्षकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मँगॅनीज इंडिया लिमिटेड कंपनीच्या खदानीत चोरी केल्याचा आरोप कंपनीच्या सुरक्षा रक्षकांनी केला होता. मात्र, या मुलांना पोलिसांच्या स्वाधीन करण्याऐवजी या सुरक्षा रक्षकांनी त्यांची अर्धनग्न करून धिंड काढली होती. याप्रकरणी या युवकांनी पोलीस स्थानकात धाव घेतल्यानंतर १० सुरक्षा रक्षक आणि कंपनीच्या व्यवस्थापकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

१६ ते २२ वयोगटातली ही १२ मुलांवर चोरीचा आरोप कंपनीच्या सुरक्षा रक्षकांनी केला. मॅगनिज इंडिया लिमिटेड कंपनीच्या खदानीत चोरी केल्याच्या संशयावरुन बारा अल्पवयीन मुलांची रस्त्यावर कपडे काढून धिंड काढण्यात आली होती. या मुलांना पोलिसांच्या स्वाधीन न करता ही अमानुष शिक्षा दिली. तसेच या मुलांची अर्धनग्न धिंड काढताना त्याचा व्हिडिओ काढण्यात आला. हा व्हिडिओ समाज माध्यमांवर व्हायरलही झाला. त्यामुळे याप्रकणी संपाप व्यक्त होत होता.