डॉ. शीतल आमटे यांचं अखेरचं ट्विट; त्यांना नेमकं काय सांगायचं होतं?

त्यांनी ट्विट करत म्हटलेलं.... 

Updated: Nov 30, 2020, 03:08 PM IST
डॉ. शीतल आमटे यांचं अखेरचं ट्विट; त्यांना नेमकं काय सांगायचं होतं?  title=
छाया सौजन्य- सोशल मीडिया

चंद्रपूर :  ज्येष्ठ समाजसेवक आणि महारोग्यांना आसरा देणाऱे बाबा आमटे baba amte यांची नात आणि डॉ. विकास आमटे यांची कन्या,  डॉ. शीतल आमटे यांच्या आत्महत्येनं सर्वत्र एकच खळबळ माजली आहे. आनंदवन Anandvan येथील महारोगी सेवा समिती सीईओ डॉ. शीतल आमटे Dr Sheetal Amte Suicide यांनी वरोरा उपजिल्हा रुग्णालयात डॉ. शीतल आमटे यांना उपचारासाठी नेले असता वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना मृत घोषित केले. 

प्राथमिक अंदाज वर्तवल्यानुसार शीतल आमटे या मागील काही दिवसांपासून मानसिक तणावाखाली होत्या. ज्यामुळं त्यांनी हे टोकाचं पाऊल उचलल्याचं म्हटलं जात आहे. 

दरम्यान, सोमवारी त्यांच्या आत्महत्येचं वृत्त समोर येण्यापूर्वी, सोमवारी सकाळी 5 वाजून 45 मिनिटांच्या सुमारास शीतल आमटे यांनी एक ट्विट केलं होतं. या ट्विटमध्ये त्यांनी ऍक्रेलिक कॅनव्हास पेंटींगचा फोटो शेअर केला. या फोटोवर चित्राच्या खाली त्यांचं नाव आणि रविवारची म्हणजेच 29 नोव्हेंबरची तारीखही दिसत आहे. 

चित्राचा फोटो पोस्ट करत त्यांनी 'वॉर ऍण्ड पीस' असं कॅप्शन त्यासोबत लिहिलं. युद्ध आणि शांतता असाच त्यांच्या या कॅप्शनचा शब्दश: अर्थ होतो. याच कॅप्शनमुळं अनेकांच्यात मनात कैक प्रश्न निर्माण होत आहेत. शीतल आमटे या माध्यमातून काही सांगू किंवा बोलू इच्छित होत्या का, यामागचं मुख्य कारण काय असेच प्रश्न आता उपस्थित केले जात आहेत. 

मुळात या ट्विटनंतर काही वेळानं पुढे जेव्हा त्यांच्या आत्महत्येची बातमी समोर आली त्यावेळी सर्वांना एकच धक्का बसला आणि नेटकऱ्यांनी त्यांना या माध्यमातून श्रद्धांजली वाहण्यास सुरुवात केली. 

 

आमटे कुटुंबात अंतर्गत संघर्ष..... 

डॉ. शीतल आमटे मागील काही काळापासून आनंदवनची संपूर्ण जबाबदारी सांभाळत होत्या. बाबा आमटे यांच्या तिसऱ्या पिढीचे नेतृत्व त्या करत होत्या. मागील काही महिन्यांपासून आमटे कुटुंबात अंतर्गत संघर्ष पेटला होता. हा वाद अनेकदा समोरही आला. या वादाच्या केंद्रस्थानी डॉ. शीतल असल्याचं म्हणत त्यांच्यावर वेळोवेळी आरोप करण्यात आले होते.