धक्कादायक ! डॉ. शीतल आमटे यांची आत्महत्या

अतिशय धक्कादायक प्रकार 

Updated: Nov 30, 2020, 02:22 PM IST
धक्कादायक ! डॉ. शीतल आमटे यांची आत्महत्या  title=

चंद्रपूर : आनंदवन (Anandvan) येथील महारोगी सेवा समिती सीईओ डॉ. शीतल आमटे (Dr Sheetal Amte Suicide) यांनी आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. वरोरा उपजिल्हा रुग्णालयात डॉ. शीतल आमटे यांना उपचारासाठी नेले असता वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना मृत घोषित केले आहे. 

सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, डॉ. शीतल आमटे यांनी स्वतःला विषारी इंजेक्शन टोचून घेतल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. मात्र अद्याप मृत्यूचे नेमके कारण अद्याप समोर आलेले नाही. 

बाबा आमटे यांची नात आणि डॉ. विकास आमटे यांची कन्या डॉ. शीतल आमटे यांनी एवढा मोठा निर्णय घेतल्यामुळे सामाजिक वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.

डॉ. शीतल आमटे सध्या आनंदवनची संपूर्ण जबाबदारी सांभाळत होत्या. बाबा आमटे यांच्या तिसऱ्या पिढीचे नेतृत्व त्या करती होत्या. मागील काही महिन्यांपासून आमटे कुटुंबात अंतर्गत संघर्ष पेटला होता. हा वाद अनेकदा समोर आला आहे. या वादाच्या केंद्रस्थानी डॉ. शीतल असल्याचं म्हणत त्यांच्यावर वेळोवेळी आरोप करण्यात आलेत.