मुंबई : ५ ऑगस्टला होणाऱ्या श्रीराम मंदिराच्या भुमिपुजन सोहळा असल्याचे काल केंद्राकडून स्पष्ट करण्यात आलं. मंदिर समितीने याचे निमंत्रण निवडक जणांनाच दिल्याचे समोर आलंय. राम मंदीर निर्माणात पुढाकार घेणाऱ्या शिवसेनेला याचे निमंत्रण अद्याप आले नाहीय. अयोध्येतील राम मंदिर भुमीपुजनास सोहळ्यास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना निमंत्रित करावे असे पत्र शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांनी लिहिलेय. अयोध्येच्या श्रीराम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टला हे पत्र पाठवण्यात आलंय.
श्रीराम मंदिराच्या निर्मिती लढ्यात उद्धव ठाकरे यांचे मोठे योगदान आहे. त्यामुळे त्यांना निमंत्रित करण्याची मागणी पत्राद्वारे करण्यात आलीयं. खासदार अरविंद सावंत यांनी देखील यावर आपली प्रतिक्रिया दिली होती. श्रीराम मंदीराच्या निर्माण कार्यात शिवसेनेने सर्वात आधी निधी जाहीर केला होता. आमचं नात प्रभु रामाशी आहे, मंदिर निर्माणाशी आहे. त्यामुळे निमंत्रणाला न बोलावण्याने काही फरक पडत नसल्याचे खासदार सावंत म्हणाले होते.
सध्या देशभरात असलेल्या लॉकडाऊनमुळे मोठ्याप्रमाणावर आर्थिक नुकसान होत आहे. अशावेळी केंद्र सरकारने त्यावर अधिक लक्ष देणे गरजेचे आहे. मात्र, काही लोकांना वाटतं राम मंदिर बांधून कोरोना जाईल. तेव्हा राम मंदिर बांधून करोना आटोक्यात येत असेल तर भूमिपूजन अवश्य करा, असा टोला शरद पवार यांनी मोदींना लगावला होता. पवारांच्या या विधानानंतर देशभरातील नेत्यांनी यावर प्रतिक्रिया दिली होती.