'दंगल पेटवणारे उच्चवर्णीय...' सुजात आंबेडकर यांचं वादग्रस्त वक्तव्य

दंगल पेटवायची असेल तर आधी स्वतःच्या मुलाला रस्त्यावर उतरवावं, राज ठाकरेंना आव्हान

Updated: Apr 12, 2022, 12:43 PM IST
'दंगल पेटवणारे उच्चवर्णीय...' सुजात आंबेडकर यांचं वादग्रस्त वक्तव्य title=

औरंगाबाद :  दंगल पेटवणारे ब्राम्हण असतात आणि खाली लढणारे बहुजनांची मुलं हेच चित्र आपल्याला पाहायला मिळत असं वादग्रस्त विधान वंचीत बहूजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांचे पुत्र सुजात आंबेडकर यांनी केलं आहे. 2014मध्ये भाजप अनेक आश्वासन देऊन सत्तेत आलं. मात्र नंतर पुढं काहीच नाही त्यामुळं भाजप असो वा राज ठाकरे यांना हिंदू धर्मात दंगल पेटवायची आहे असं दिसतंय, असं सुजात आंबेडकर यांनी म्हटलं आहे. 

 'आतापर्यंत आपण कितीही दंगली बघितल्या बाबरी मस्जिदची दंगल असो, भीमा कोरेगावची दंगल असो, आपण हेच बघितलं की दंगल पेटवणारे सहसा उच्चवर्णीय आणि उच्चवर्गीय ब्राह्मण असतात. त्यांच्या वक्तव्यामुळे प्रभावीत होऊन जे रस्त्यावर उतरतात ते बहुजन मुलं असतात, असं वक्तव्य सुजात आंबेडकर यांनी केलं आहे. 

राज ठाकरे यांना आव्हान

राज ठाकरेंना माझे एवढंच म्हणणे होते की, तुम्हाला दंगल पेटवायची असेल आणि हनुमान चालिसा म्हणायला लावायची असेल लोकांना तर बहूजन मुलांच्या आधी स्वतःच्या मुलाला रस्त्यावर उतरवावं आणि जर तुम्ही स्वत:च्या मुलाला रस्त्यावर उतरवणार नसाल तर दुसऱ्यांच्या मुलालाही उतरवू नका, असं आवाहनही सुजात आंबेडकर यांनी केलं आहे.
 
भाजपा आणि मनसेवर साधला निशाणा
2014 पासून भाजप सत्तेवर आलं आहे. लोकांच्या भूकमारीचा प्रश्न, शिक्षणाचा प्रश्न, बेरोजगारीचा प्रश्न असे सर्व आश्वासन देऊन भाजप सत्तेत आला. पण सत्तेत आल्यानतंर ना कुणी भूकमारीवर बोलतोय, ना कोणी बेरोजागारीवर बोलतोय, ना शिक्षणाबद्दल आणि ना युवकांच्या प्रश्नाबद्दल बोलतोय, 

लॉकडाऊनंतर आरोग्य व्यवस्था कोलमडून पडलेली. त्याच्याबद्दलही कोणी बोलत नाही. राज ठाकरे आणि भाजप हिंदू-मुस्लीम बद्दल बोलत असतील तर त्यांचा एकच हेतू आहे लोकांना धर्माच्या प्रश्नांमध्ये अडकवून ठेवणं जेणेकरुन महत्त्वाच्या प्रश्नांवर बोलणार नाही, पण आम्ही ते होऊ देणार नाही असा इशाराही सुजात आंबेडकर यांनी केला आहे.