कचरा गोळा करणाऱ्या कर्मचाऱ्यांना एमआयएम नगरसेवकांकडून मारहाण

संतप्त झालेल्या कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी काम बंद केलं आहे.

Updated: Nov 14, 2019, 10:56 AM IST
कचरा गोळा करणाऱ्या कर्मचाऱ्यांना एमआयएम नगरसेवकांकडून मारहाण  title=

औरंगाबाद : औरंगाबाद शहरात कचरा संकलन करणाऱ्या खाजगी कंपनीच्या कर्मचार्‍यांना एमआयएमच्या नगरसेवकांनी मारहाण केली आहे.. नगरसेवक अबुल हसन हाश्मी याने ही मारहाण केली आहे. या घटनेनंतर कंपनीने नगरसेवकाच्या विरोधात पोलिसात तक्रार दिली नाही. त्यामुळे कामगार संतप्त झाले. संतप्त झालेल्या कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी काम बंद केलं आहे.

औरंगाबाद आमखास मैदान जवळ खुल्या जागेत कचरा संकलन करणाऱ्या कंपनीच्या मोठ्या गाड्या लावण्यात येतात. त्यात असलेल्या कचऱ्यामुळे रोगराई पसरत असल्याचा त्याचं म्हणणं होतं. यात कंपनीच्या कर्मचाऱ्यांसोबत त्याचे हमरीतुमरी झाली आणि यात या नगरसेवकांनी या कर्मचार्‍यांना मारहाण केल्याचा प्रकार घडला.