औरंगाबाद : जन्मोजन्मी हाच पती मिळावा म्हणून स्त्रिया वटपोर्णिमा साजरी करतात. पूजा अर्चाही करतात. मात्र सात जन्म काय पुढच्या सात सेंकदांसाठीसुद्धा ही पत्नी नको म्हणून आज औरंगाबादेत काही पुरूषांनी पिंपळ पोर्णिमा साजरी केली. पिंपळाच्या झाडाची पूजा करून छळ करणा-या पत्नींचा या पुरुषांनी निषेध केला. बायकोच्या त्रासामुळे किती वैतागलोय याचा पाढाच ही पुरुष मंडळी मांडताय.
पत्नी पीडित नावाची ही संघटना नेहमीच पत्नीच्या छळापासून त्रासलेल्य़ा नव-यांना मदत करते. त्यामुळे वटपोर्णिमेचा मुहूर्त साधत या पुरुषांनीही त्रास देणा-या महिलांचा आगळावेगळा निषेध केला.. अनेक पुरुष आता या संघटनेत सहभागी होत त्यांनी ही महिलांकडून पुरुषांवरील होणाऱ्या अत्याचारांचा निषेध केलाय. पिंपळाच्या झाडाला गोल फिरत दोरा बांधून मुंजा असलेल्या पिंपळाच्या झाडाची पूजा या पुरुषांनी केली.