बॉलमधून गांजा पोहोचण्याचा प्रयत्न, कोल्हापुरात तिघांना अटक

कळंबा मध्यवर्ती कारागृहात (Kalamba Central Jail) टेनिस बॉलमधून (Tennis ball) गांजा (Cannabis) पोहोचण्याचा प्रयत्न पोलिसांनी हाणून पाडला आहे. 

Updated: Nov 11, 2020, 10:18 AM IST
बॉलमधून गांजा पोहोचण्याचा प्रयत्न, कोल्हापुरात तिघांना अटक  title=

कोल्हापूर : कळंबा मध्यवर्ती कारागृहात (Kalamba Central Jail) टेनिस बॉलमधून (Tennis ball) गांजा (Cannabis) पोहोचण्याचा प्रयत्न पोलिसांनी हाणून पाडला आहे. कारागृहाच्या भिंतीजवळ क्रिकेट (Cricket) खेळण्याच्या बहाण्याने गांजा कारागृहात पोहोचवण्याचा इरादा होता. गांजा पोहोचण्याचा प्रयत्न करणाऱ्या तिघांना कोल्हापूरमधील (Kolhapur) जुना राजवाडा पोलिसांनी (Police) अटक केली आहे.

टेनिस बॉल कापून पुन्हा चिकटवलेले हे बॉल आणि १५ ग्रॅम गांजा पोलिसांनी जप्त केला आहे. वैभव कोठारी, संदेश देशमुख आणि अमित पायगुडे अशी अटक करण्यात आलेल्या संशयितांची नावे आहेत. हे तिघेही संशयित पुण्याचे आहेत.