कैद्यांना मोबाईल : अलिबाग कारागृहातील दोन पोलीस कर्मचारी निलंबित

अलिबाग कारागृहातील (Alibag jail) दोन पोलीस कर्मचाऱ्यांवर निलंबनाची (Two policemen suspended) कारवाई करण्यात आली आहे.  

Updated: Nov 11, 2020, 09:47 AM IST
कैद्यांना मोबाईल : अलिबाग कारागृहातील दोन पोलीस कर्मचारी निलंबित  title=
संग्रहित छाया

रायगड : अलिबाग कारागृहातील (Alibag jail) दोन पोलीस कर्मचाऱ्यांवर निलंबनाची (Two policemen suspended) कारवाई करण्यात आली आहे. पैश्यांच्या मोबदल्यात कैद्यांना मोबाईल (Mobile) पुरवल्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आली आहे. अर्णब गोस्वामी (Arnab Goswami) यांना कारागृहाच्या विलगीकरण कक्षात ठेवण्यात आले होते. मात्र तिथ त्यांनी मोबाईलचा वापर केला. याप्रकरणी तिन्ही आरोपींची तळोजा कारागृहात रवानगरी करण्यात आली. मातर् याप्रकरणानंतर खात्याअंतर्गत चौकशी झाली. यात दोन पोलील कर्मचारी कैद्यांना मोबाईल वापरासाठी (Prisoner's Mobile Use ) देत असल्याचे समजले. त्यामुळे दोघांवरही कारवाई करण्यात आली. मात्र अर्णब यांच्याकडे मोबाईल कसा आला, याबाबत अजुनही चौकशी सुरू आहे. 

अन्वय नाईक (Anvay Naik) आत्महत्या प्रकरणात कारागृहात असलेले रिपब्लिक टीव्‍हीचे संपादक अर्णब गोस्वामी (Arnab Goswami) यांना मोबाईल फोन (Mobile) पुरवल्याची बाब दोनच दिवसांपूर्वी समोर आली होती. आता कैद्यांना मोबाईल फोन पुरविल्याच्या प्रकरणी अलिबागच्‍या दोन कारागृह पोलीसांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. गोस्‍वामी यांना अलिबाग कारागृहाच्या विलगीकरण कक्षात ठेवण्यात आले होते. तेथे त्‍यांनी मोबाईल फोनचा वापर होत असल्याचे स्पष्ट झाले आहे.

या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन कारागृह प्रशासनाने खातेनिहाय चौकशी सुरु केली होती. इतर कैद्याकडेही याबाबत चौकशी करण्यात आली. यावेळी कारागृहातील दोन पोलीस पैसे घेऊन कैद्यांना स्वतःचा मोबाईल वापरासाठी देत असल्याचे समोर आले. यानंतर सुभेदार अनंत भेरे आणि पोलीस शिपाई सचिन वाडे यांना निलंबित करण्यात आले आहे. 

दरम्यान अर्णब गोस्वामी यांच्याकडे मोबाईल कसा आला या प्रकरणाची चौकशी अद्याप सुरु असल्याचेही कारागृह अधिक्षक ए. टी. पाटील यांनी स्पष्ट केले आहे. दरम्‍यान अर्णब यांना मच्छर पळवणारी कॉईल यासारख्या विषारी वस्तूही पुरवण्यात आल्याचे समोर आले आहे.