Rahul Narvekar mail hacked: विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांचा अधिकृत मेल हॅक करण्यात आलाय. हॅकर्स एवढ्यावरच थांबला नसून त्याने या मेलवरुन थेट राज्यपालांनाच मेल केलाय. यामुळे एकच खळबळ उडाली.
राहुल नार्वेकर यांच्या ईमेलवरुन राज्यपालांना ईमेल पाठवण्यात आला. यामध्ये आमदारांवर कारवाईची मागणी करण्यात आली. जे आमदार सभागृहात नीट वागत नाही त्यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी या हॅक केलेल्या ईमेलच्या माध्यमातून करण्यात आल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे.
ईमेल हॅकप्रकरणी सायबर पोलीस यंत्रणा सतर्क झाली असून सखोल तपास सुरु आहे. यासंदर्भात चौकशी सुरु आहे. असा कोणताही मेल केला नसल्याचेही काहीजण सांगत आहेत. पोलीस तपासात काय निष्पन्न होते? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
PWD कडून देण्यात आलेली पावती ग्राह्य धरण्यात यावी अशी बीडीडीकरांची मागणी होची. त्यासंदर्भात मी पीडब्ल्यूडी आणि एसआरए दोन्ही विभागांशी बोललोय. ज्यांचा सर्व्हे होऊ शकला नाही पण 1-1-2000 सालच्या आधीच्या पावत्या असतील तर त्या ग्राह्य धराव्या असं मी म्हटलं आहे. यासंदर्भात लवकरच निर्णय घेऊ असे राहुल नार्वेकरांनी म्हटले
नव्या इमारतींच्या वर्षभरात चाव्या देतील. थांबू नका, असं मी त्यांना सांगितलं. पुढच्या फेज मधील नागरिकांचे करार करून पावसाळ्याच्या आत काम सुरू करण्याचे आदेश दिले आहेत. 2-3 वर्षात काम संपवण्याचा प्रयत्न असेल. 10 हजार स्क्वेअर फूट दवाखाना त्वरित तयार करण्याचं मी सांगितलं आहे. जोवर डेव्हलपमेंट होणार नाही तोवर काहीही त्रास होणार नाही याची काळजी घेतली जाईल, असेही नार्वेकर म्हणाले.
यावेळी नार्वेकरांनी आदित्य ठाकरेंच्या मतदार संघावर भाष्य केलं. वरळीकर भाग्यवान लोक आहे. .येथे 3 आमदार आहेत. पण तरीही यांच्या माथी निराशा आली आहे. हे सगळं दूर करायचं आहे. त्यासाठी प्रामाणिकता महत्त्वाची आहे. दिल्लीचा मार्ग असेल किंवा कोणताही... पक्ष सांगेल तो मार्ग आवडेल. भाजप पक्षाने मला खूप दिलं आहे. आणखी काहीही मागायचे नाहीये, असे ते म्हणाले.