नाशिक : शिवसेना भाजपची युती झाल्यानं अनेकांच्या निवडणूक लढविण्याच्या स्वप्नांवर पाणी फिरलंय. नाशिक पूर्व मतदार संघात भाजापाचे विद्यमान आमदार बाळासाहेब सानप यांनी बंड पुकारलं असून ते आता राष्ट्रवादीकडून निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. नाशिक पश्चिममध्ये विद्यमान आमदार सीमा हिरे यांना पुन्हा उमेदवारी दिल्यानं शिवसेनेनं या जागेवर दावा करत बंड पुकारलंय.
नाशिक देवळालीमध्ये विद्यमान आमदार योगेश घोलप यांना पुन्हा उमेदवारी दिल्यानं भाजपच्या नगरसेविका सरोज आहिरे यांनी भाजपाला सोडचिठ्ठी देत राष्ट्रवादीकडून उमेदवारी घेतलीय. तर राष्ट्रवादीकडून मंडाले यांचे पुत्र सिद्धांत मंडाले यांनी मनसेचा झेंडा हाती घेतलाय.
नांदगावमध्ये शिवसेनेच्या सुहास कांदेना उमेदवारी दिल्यानं भाजपच्या संजय पवार, रत्नाकर पवार, पंकज खताळ आणि सेनेच्या गणेश धात्रक यांनी बंड पुकारला असून उमेदवारी अर्ज दाखल केलाय. सटाण्यात राकेश घोडे यांनी भाजपच्या दिलीप बोरसे यांच्या विरोधात बंड पुकारलय.
धनराज महाले यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केलाय. छगन भुजबळ यांच्या विरोधात कल्याणराव पाटील यांनी बंड पुकारलाय. तर चांदवडमध्ये भाजपचे उमेदवार असलेले राहुल आहेर यांच्या विरोधात आत्माराम कुंभार्डे यांनी बंड पुकारलंय.