मिलिंद देवरा यांची पावलं भाजपाच्या दिशेने?

मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष मिलिंद देवरा यांच्याकडून नरेंद्र मोदींच्या ह्युस्टेन येथील भाषणाचे ट्विटद्वारे कौतुक करण्यात आले

Updated: Sep 24, 2019, 08:16 AM IST
मिलिंद देवरा यांची पावलं भाजपाच्या दिशेने? title=

दीपक भातुसे, झी मीडिया, मुंबई : मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष मिलिंद देवरा यांच्याकडून नरेंद्र मोदींच्या ह्युस्टेन येथील भाषणाचे ट्विटद्वारे कौतुक करण्यात आले आहे. मोदींचे कौतुक करताना मिलिंद यांनी आपल्या वडीलांनी भारत - अमेरिका संबंध सुधारण्यासाठी केलेल्या प्रयत्नांचा उल्लेख केला. मिलिंद देवरांच्या या ट्विटला पंतप्रधान मोदी यांनी रिट्वीट करुन उत्तरही दिले. त्यामुळे राजकीय वर्तुळात या ट्वीटची चर्चा रंगू लागली आहे. 370 कलम असो किंवा पंतप्रधान मोदींचे भाषण असो मिलिंद देवरा हे भाजपच्या समर्थनार्थ उतरताना दिसत आहेत. मिलिंद देवरा यांची पाऊले भाजपाच्या दिशेने असल्याचे हे संकेत आहेत का ? अशा चर्चांना उधाण आले आहे. 

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मिलिंद देवरांच्या ट्विटचे आभार मानले.

मुरली देवरा असते तर त्यांनाही भारत आणि अमेरिकेचे आजचे संबंध पाहून आनंद झाला असता असे पंतप्रधान मोदी यांनी म्हटले. लोकसभेची निवडणूक हरल्यापासून मिलिंद देवरांनी अनेक वेळा भाजपला समर्थन भूमिका घेतली आहे. तर दुसरीकडे लोकसभा निवडणुकीतील पराभवानंतर मिलिंद देवरा काँग्रेस पक्षापासून अंतर ठेवून आहेत. त्यामुळे त्यांच्या भूमिकेविषयी राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.