रत्नागिरी : कोकणातल्या गणेशोत्सवाची सुरुवात भाद्रपद प्रतिपदेपासून झाली आहे. कोकणातल्या देवरुख येथील पहिल्या मानाच्या गणपतीचं आगमन आज झाले.
संगमेश्वर तालुक्यातील देवरुख मधल्या चौसुपी वाड्यातील जोशी यांचा हा गणपती ३७० वर्षांपासून पारंपरिक वाद्याच्या साथीने आणला जातो. घोड्यावर आरुढ झालेली दिमाखदार मूर्ती डोक्यावरुन घेवून ही मिरवणूक निघते.
पारंपरिक वाद्यात देवरुखमधल्या रस्त्यांवरुन ही आगमन मिरवणूक काढली जाते. अत्यंत पारंपरिक पद्धतीने या गणरायाचं आगमन जोश्यांच्या चौसुपी वाड्यात झाले. पेशवेकाळापासून या गणपतीची ही अशीच आगमन मिरवणूक काढली जातेय.
रिद्धी सिद्धी आणि दरवर्षी एकच आकार उंची असणारी ही गणेशमूर्ती उजव्या सोंडेची आहे.. या गणपतीचे आगमन झाल्यानंतर कोकणातील गणेशोत्सवाला सुरुवात होते.