उद्धव ठाकरे यांना आणखी धक्का? शिवसेनेचा आणखी एक आमदार शिंदे गटात सामील होण्याची शक्यता

विधानपरिषद निवडणुकीनंतर राज्यात तापलेले वातावरण शांत होण्याची कोणतीही चिन्हं सध्या दिसत नाहीये. शिवसेनेचे 39 आमदार एकनाथ शिंदे यांच्या गटात सामिल झाले आहेत. त्यामुळे ही घटना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासाठी मोठा धक्का मानला जात आहे.

Updated: Jun 27, 2022, 08:14 AM IST
उद्धव ठाकरे यांना आणखी धक्का? शिवसेनेचा आणखी एक आमदार शिंदे गटात सामील होण्याची शक्यता title=

गुवाहाटी : विधानपरिषद निवडणुकीनंतर राज्यात तापलेले वातावरण शांत होण्याची कोणतीही चिन्हं सध्या दिसत नाहीये. शिवसेनेचे 39 आमदार एकनाथ शिंदे यांच्या गटात सामिल झाले आहेत. त्यामुळे ही घटना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासाठी मोठा धक्का मानला जात आहे.

विधानपरिषद निवडणुकीनंतर शिवसेनेतील बंडाळी सर्वांसमोर आली. अनेक आमदार सूरत आणि नंतर गुवाहाटीत एकनाथ शिंदे यांच्या गटाला सामील झाले आहेत. काही आमदार पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासोबत झालेल्या बैठकीनंतरही शिंदे गटाला सामील झाले आहे. यामध्ये सेनेचे महत्वाचे नेते गुलाबराव पाटील, दिपक केसरकर यांच्यानंतर काल उदय सामंत देखील शिंदे गटात सहभागी झाले. 

यानंतर शिंदे गटात गेलेल्या शिवसेना आमदारांची संख्या 39 इतकी झाली आहे. शिंदे गटात आणखी 9 अपक्ष देखील आहेत. त्यामुळे 48 आमदारांचे संख्याबळ शिंदे गटाकडे आहे. 

महत्वाचे म्हणजे आज देखील शिवसेनेचा एक आमदार शिंदे गटाला सामील होण्याची शक्यता आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे यांना पुन्हा एक धक्का बसण्याची शक्यता आहे.