आजपासून महाराष्ट्राच्या आनंदवारीला सुरुवात

वारकरी आणि दिंड्यानी देहू गजबजून गेली

shailesh musale शैलेश मुसळे | Updated: Jun 16, 2017, 12:31 PM IST

देहू : जून महिना उजाडला कि अवघ्या महाराष्ट्राला वेध लागतात ते आषाढी एकादशीचे. आजपासून महाराष्ट्राच्या आनंदवारीला सुरुवात होते आहे. संत तुकाराम महाराजांची पालखी ही आज देहूहुन प्रस्थान ठेवेल. तुकाराम महाराजांच्या पालखीसोबत सहभागी होणा-या वारकरी आणि दिंड्यानी देहू गजबजून गेली आहे. 

संत तुकाराम महाराजांच्या पालखीचा आजचा मुक्काम हा इनामदार वाड्यात असणार आहे. तर आळंदीत ही वारक-यांची गर्दी सुरु झाली आहे. संत ज्ञानेश्वरांची पालखी शनिवारी पंढरपुरच्या दिशेने प्रस्थान ठेवेल. संत ज्ञानेश्वरांचा मुक्काम हा शनिवारी आळंदीमध्ये आपल्या आजोळी म्हणजेच गांधीवाड्यात असेल. गावोगावाहून निघालेल्या दिंड्या पताका आणि पालख्या या आता पंढरपूरच्या दिशेने मार्गस्थ व्हायला सुरुवात झाल्याने सगळं वातावरण विठ्ठलमय झालं आहे.