Shiv Sena New Office Anand Ashram : केंद्रीय निवडणूक आयोगाने दिलेल्या निर्णयामुळे उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना जबरदस्त धक्का बसला. शिवसेना (shivsena) आणि धनुष्यबाण (Dhanushyaban) चिन्ह ठाकरेंच्या हातून गेले आहे. शिवसेना हे नाव धनुष्यबाण चिन्ह दोन्ही शिंदे गट अर्थात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांना मिळाले आहे. यामुळे शिंदे गटाची तकाद आणखी वाढली आहे. शिंदे गटाने सर्वप्रथम मंत्रालयातील शिवायल हे कार्यालय (Shivalay Office) ताब्यात घेतले. शिवसेनेचे मध्यवर्ती कार्यालय असलेलेले शिवसेना भवन (Shivsena Bhavan) शिंदे गट ताब्यात घेणार अशी चर्चा रंगली असताना आता यात मोठा ट्विस्ट आला आहे. शिदें गटाने थेट शिवसेना मध्यवर्ती कार्यालयाचा पत्ताच बदलला आहे.
दादर येथील शिवसेना भवन (Shivsena Bhavan) हे शिवसेना पक्षाचे मध्यवर्ती कार्यालय आहे. शिंदे गट शिवसेना भवनावर दावा करत असल्याची चर्चा सुरु असतानाच शिदें गटाने शिवसेना मध्यवर्ती कार्यालयाचा पत्ताच बदलला आहे. शिंदे गटाच्या लेटरहेडवर दादरच्या शिवसेना भवनाऐवजी ठाण्याच्या टेंभी नाक्याचा पत्ता देण्यात आला आहे.
शिवसेना (shivsena) आणि धनुष्यबाण (Dhanushyaban) चिन्ह ताब्यात आल्यानंतर मंगळवारी शिवसेना सचिव संजय मोरे यांनी एक सूचना पत्रक जारी केले आहे. यापुढे बाळासाहेबांची शिवसेना ऐवजी फक्त शिवसेना असा उल्लेख करावा असे त्यांनी पत्रकात म्हंटले आहे. याआधी शिवसेना मध्यवर्ती कार्यालय म्हणून दादर येथील शिवसेना भवनचा उल्लेख केला जात असे. मात्र, शिंदे गटाकडून प्रसिद्ध करण्यात आलेल्या या नियुक्ती पत्रकावर प्रथमच ठाण्यातील आनंदआश्रमच्या पत्त्याचा उल्लेख मध्यवर्ती कार्यालय असा करण्यात आला आहे.
शिवसेनेचा पक्ष फंड, शाखा आणि शिवसेना भवनावर शिंदे गट दावा करणार नाही असं शिंदे गटाचे मंत्री दिपक केसरकर यांनी स्पष्ट केले आहे. तरीदेखील उद्धव ठाकरे अफवा पसरवून सहानुभूती मिळवतायत असा गंभीर आरोप केसरकरांनी केला. शिवसैनिकांचे पैसे ठाकरेंनी स्वतःच्या नावावर वळवलेत.ठाकरेंनी सेनेची घटनाही बदलली असून, हक्क स्वतःकडे घेतल्याचा आरोप केसरकरांनी केला.
सत्ता संघर्षानंतर शिंदे गटाकडून ठाण्यातील आनंद आश्रम नाव बदले आहे. बाळासाहेबांची शिवसेना आनंद आश्रम असं आनंद आश्रमला नव्याने नाव देण्यात आलेल आहे. बाळासाहेबांची शिवसेना या पक्षाचं कार्यालय या ठिकाणी आहे. आता हेच शिवसेनेचे मध्यवर्ती कार्यालय असणार आहे. शिवसेना भवनावर शिंदे गट दावा करणार नाही असं शिंदे गटाकडून स्पष्ट करण्यात आले. यानंतर ठाण्यातील आनंदआश्रमाचा पत्ता लेटरहेडवर प्रसिद्ध केल्यामुळे सध्या तरी शिंदे गटाने मध्यवर्ती कार्यालय हेच राहील अशी चर्चा रंगली आहे.
शिवसेनेच्या स्थापनेनंतर 8 वर्षांनी म्हणजे 1974 मध्ये दादर येथील शिवसेना भवन उभारलं गेलं. शिवसेना भवन ही शिवाई ट्रस्टची संपत्ती आहे. शिवसेना भवन तयार करताना आर्टिकेटनं किल्ल्यासारखा आकार देण्याचं ठरवलं. खुद्द बाळासाहेब ठाकरे शिवसेना भवनाच्या बांधकामावर लक्ष ठेवून होते. मीनाताई ठाकरेंच्या इच्छेनुसार शिवसेना भवनात आंबेमातेचं मंदिर उभारण्यात आलं. महाराष्ट्रात कुठल्याही राजकीय पक्षाचं इतकं भव्य पक्ष कार्यालय नाही. वर्गणीच्या माध्यमातून शिवसेना भवन उभं राहिलं आहे.