Amruta Fadnavis vs Priyanka Chaturvedi: "हीच तुझी औकात आहे," अमृता फडणवीस प्रियंका चतुर्वैदींवर संतापल्या, जोरदार भांडण

Amruta Fadnavis vs Priyanka Chaturvedi: राज्याचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या पत्नी अमृता फडणवीस (Amruta Fadnavis) आणि ठाकरे गटाच्या खासदार चतुर्वेदी (Priyanka Chaturvedi) यांच्यात जोरदार भांडण झालं आहे. अमृता फडणवीस यांनी प्रियंका चतुर्वेदी यांची लायकी काढली असून त्यांनीही प्रत्युत्तर दिलं आहे.   

Updated: Mar 16, 2023, 08:38 PM IST
Amruta Fadnavis vs Priyanka Chaturvedi: "हीच तुझी औकात आहे," अमृता फडणवीस प्रियंका चतुर्वैदींवर संतापल्या, जोरदार भांडण  title=

Amruta Fadnavis vs Priyanka Chaturvedi: राज्याचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या पत्नी अमृता फडणवीस (Amruta Fadnavis) यांना 1 कोटींची लाच देण्याचा प्रयत्न झाल्याने राज्यात मोठी खळबळ उडाली आहे. पोलिसांनी याप्रकरणी कारवाई करत अनिक्षा नावाच्या तरुणीला उल्हासनगरमधून (Ulhasnagar) अटक केली आहे. देवेंद्र फडणवीस यांनीदेखील याप्रकरणी विधानसभेत निवेदन देत संपूर्ण प्रकार सांगितलं आहे. दरम्यान या घटनेवरुन ठाकरे गटाच्या खासदार प्रियंका चतुर्वेदी (Priyanka Chaturvedi) आणि अमृता फडणवीस यांच्यात शाब्दिक चकमक उडाली आहे. दोघींचं ट्विटरवर जोरदार भांडण झालं आहे. 

अमृता फडणवीस यांनी दोन महिन्यांपूर्वी एका डिझानयर विरोधात तक्रार दाखल केली होती. अमृता फडणवीस यांनी अनिक्षा नावाच्या महिलेविरोधात मलबार हिल पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती. धमकी आणि कट रचल्याचा आरोप अमृता फडणवीस यांनी केला होता. 1 कोटींची लाच देण्याचा प्रयत्न झाल्याचा आरोपही अमृता फडणवीसांनी केला होता. 

प्रियंका चतुर्वेदी यांचं ट्विट
 

प्रियंका चतुर्वेदी यांनी याप्रकरणी ट्वीट करत अमृता फडणवीस यांना लक्ष्य केलं होतं. "एका गुंडाच्या मुलीला उपमुख्यमंत्र्यांच्या घरात घुसण्यास मिळतं आणि 5 वर्ष त्यांच्या पत्नीशी मैत्री करते. त्यांच्या पत्नीला दागिने, कपडे देते. त्यांच्या कारमधून फिरते. ही डिझायनर मैत्रीण त्यांना आपण बुकींची माहिती देत, त्यांच्यावर धाड टाकत आणि तडजोड करत त्यातून पैसे कमावू शकतो असं सुचवते. पण त्यानंतरही त्यांची मैत्री कायम राहिते. आता यासंबंधी व्हिडीओ आणि आरोप आहेत. महाराष्ट्रात काय सुरु आहे," असं ट्वीट प्रियंका चतुर्वैदी यांनी केलं. 

पुढे त्या म्हणाल्या की "आता उपमुख्यमंत्री हा राजकीय कट असल्याचं म्हणतात. राज्याचे पोलीस नक्की कोणाला रिपोर्ट करतात? देवेंद्र फडणवीसांना,  राज्याचे गृहमंत्री कोण आहेत? देवेंद फडणवीस, तक्रारदार कोण आहे? अमृता फडणवीस....मग याप्रकरणी स्वतंत्र चौकशी नको का?".

"गृहमंत्र्यांनी व्हिडीओशी छेडछाड केल्याचा दावा केला आहे. पण जर हे विरोधी नेत्यासोबत झालं असतं तर उपमख्यमंत्र्यांनी भ्रष्टाचार, ईडी, सीबीआय अशी आरडाओरड केली असती," असंही त्यांनी म्हटलं. 

अमृता फडणवीसांनी काढली 'औकात'

प्रियंका चतुर्वेदी यांच्या ट्विटला अमृता फडणवीस यांनी उत्तर देत म्हटलं की "मॅडम चतूर, तुम्ही याआधी मी अॅक्सिस बँकेला फायदा मिळवून दिल्याचे खोटे आरोप केले होते. पण आता तुम्ही माझ्या सत्यतेला आव्हान देत आहात. तुमचा विश्वास जिंकल्यानंतर प्रकरण दडपण्यासाठी जर कोणी पैसे घेऊन तुमच्याशी संपर्क साधला असता तर तुम्ही नक्कीच तुमच्या नेत्यांकरवी त्या व्यक्तीला मदत केली असती. हीच तुमची औकात आहे". 

दरम्यान यानंतरही दोघींमध्ये वाद सुरु असून ट्विटरला एकमेकींना प्रत्युत्तर दिलं आहे.