रवी राणा यांचा उद्धव ठाकरे आणि अमरावतीच्या पोलीस आयुक्तांवर गंभीर आरोप, म्हणाले...

रवी राणा यांचा उद्धव ठाकरे आणि अमरावतीच्या पोलीस आयुक्तांवरर गंभीर आरोप, म्हणाले...

Updated: Sep 13, 2022, 03:04 PM IST
रवी राणा यांचा उद्धव ठाकरे आणि अमरावतीच्या पोलीस आयुक्तांवर गंभीर आरोप, म्हणाले... title=

Maharashtra Politics : आमदार रवी राणा (Ravi Rana) यांनी शिवसेना (Shivsena) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि अमरावतीच्या पोलीस आयुक्त आरती सिंग (Amravati Police Commissioner Arti Singh) यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. आरती सिंग यांनी अमरावतीतून दर महिन्याला सात कोटींची अवैध वसुली करून त्यातील पैसा ठाकरे यांच्यापर्यंत पोहोचवल्याचा आरोप राणा यांनी केलाय.

तसंच राणा दाम्पत्यावर जेवढे गुन्हे दाखल करता येतील तेवढे खोटे गुन्हे दाखल करा, असा एकसूत्री कार्यक्रम मविआ सरकार (Mahavikas Aghadi Government) असताना पोलीस आयुक्तांना दिला होता. त्यामुळेच आमच्यावर खोटे गुन्हे दाखल केल्याचा आरोप राणांनी केलाय.

पोलीस आयुक्त आरती सिंग यांनी तेव्हाच्या मुख्यमंत्र्यांना खूश करण्यासाठी आमच्यावर खोटे गुन्हे दाखल केले. मनपा आयुक्तांवर शाईफेक प्रकरणातही मला गोवण्यात आलं. तेव्हा मी अमरावतीत उपस्थित नसतानाही माझ्यावर गंभीर गुन्हे दाखल करण्यात आले. शिवाजी महाराजांचा पुतळा काढण्यात आला तेव्हा मोठ्या प्रमाणावर पोलीस पाठवून मला दोन दिवस नजरकैदेत ठेवण्यात आलं असा आरोप रवी राणा यांनी केलाय. इतकंच नाही तर कोल्हे हत्या प्रकरण दाबण्याचा प्रयत्नही आरती सिंग यांनी केल्याचा गंभीर आरोप रवी राणा यांनी केला आहे. 

आमच्या विरोधात दाखल केलेले खोटे गुन्हे आणि आरती सिंग यांनी केलेली अवैध वसुली यासंदर्भात तपास सीआयडी (CID) कडे देण्यात आलेला आहे. आमच्याकडे त्या संदर्भात पुरावे आहेत, ऑडिओ क्लिपिंग (Audio Clip) आहेत आणि आम्ही योग्य वेळी ती सीआयडी कडे देऊ असं रवी राणा यांनी म्हटलं आहे.