अडीच वर्षीय चिमुरडीवर बलात्कार

अडीच वर्षीय मुलीवर १७ वर्षाच्या अल्पवयीन मुलाचा बलात्कार

Updated: Feb 16, 2020, 02:54 PM IST
अडीच वर्षीय चिमुरडीवर बलात्कार title=

अमरावती : जिल्हात अडीच वर्षीय चिमुकलीवर बलात्कार झालाय. अमरावती जिल्ह्यातल्या लोणी टाकळी पोलीस ठाण्या अंतर्गत येणाऱ्या एका गावात एका अडीच वर्षीय मुलीवर १७ वर्षाच्या अल्पवयीन मुलाने बलात्कार केल्याची धक्कादायक घटना  घडलीय. आरोपीला अटक करण्यात आलीय. 

बलात्कार करनारा अल्पवयीन आरोपी व अडीच वर्षाची या दोघांचेही घर एकाच परिसरात आहे. 

अडीच वर्षाची पीडित चिमुकली ही आरोपीच्या घरी खेळायला गेली असता सतरा वर्षीय अल्पवयीन तरुणाने तिच्यावर लैगिंक अत्याचार केला.

याची माहिती मुलीच्या वडिलांना कळताच त्यांनी पोलिसात धाव घेतली. याप्रकरणी पोलिसांनी १७ वर्षीय आरोपीला अटक करून बलात्काराचा गुन्हा नोंद केला आहे.