अमरावतीत ऑक्सिजन सिलेंडरचा तुटवडा; २५० सिलेंडरची मागणी पण पुरवठा १२५ चा

 ऑक्सिजन सिलेंडरचा तुडवडा निर्माण झाल्याने कोरोना रुग्णांची चिंता वाढली

Updated: Aug 31, 2020, 10:22 AM IST

अमरावती : एकीकडे अमरावती जिल्ह्यातील कोरोना बधितांचा रुग्णांणचा आकडा हा साडेपाच हजारांवर गेला. तर कोरोना बधितांची संख्या ही १२८ वर पोहोचली आहे. अशातच कोरोना रुग्णांची चिंता वाढवणारी धक्कादायक माहिती समोर आली आहे. रुग्णांना लागणार ऑक्सिजन सिलेंडरचा तुडवडा निर्माण झाल्याने कोरोना रुग्णांची चिंता वाढली आहे.

जिल्ह्यात सध्या १००० पेक्षा जास्त कोरोना बाधित रुग्ण हे उपचार घेत आहे. त्यातील अनेक कोरोना रुग्णांना श्वसनाचा त्रास असल्याने त्यांना ऑक्सिजन सिलेंडर ची गरज आहे. परंतु सिलेंडर अभावी रुग्ण दगावण्याची भीती वाढत असल्याने सिलेंडरचा पुरवठा वाढवावा अशी मागणी माजी कृषी मंत्री डॉ अनिल बोंडें यांनी जिल्हा प्रशासना कडे केली आहे.

जिल्ह्यातील दरोरोज आता कोरोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. परंतु त्या तुलनेत ऑक्सिजन सिलेंडरचा तुटवडा निर्माण होत असल्याची धक्कादायक माहिती भाजप नेते डॉ अनिल बोंडे यांनी दिली. जिल्ह्यात कोरोना व सारीच्या रुग्णाना दरोरोज सरासरी २५० ऑक्सिजण सिलेंडरची गरज असताना फक्त १२५ सिलेंडरच उपलब्ध होत असल्याची खळबळजनक माहिती समोर आली आहे.

अमरावती मधील सुपर स्पेशालिस्ट, पी. डी. एम. सी. व काही खाजगी रुग्णालयात कोव्हिडं वर उपचार सुरू आहे. या रुग्णालयात लागणाऱ्या ऑक्सिजन सिलेंडर हे नागपूर वरून सुद्धा येतात परंतु अमरावती आणि नागपूर यातील सिलेंडर मध्ये तफावत असल्याचंही डॉ. बोंडें म्हणाले. त्यामुळे तात्काळ सिलेंडर चा सुरळीत पुरवठा करावा अशी मागणी त्यांनी केली आहे.