'गरबा कार्यक्रमात फक्त हिंदूंना प्रवेश द्या', विश्व हिंदू परिषदेची मागणी

Only Hindus Participate in Garba: विश्व हिंदु परिषदेच्या मागणीला नितेश राणे यांनी दुजोरा दिला आहे. दांडिया खेळायला येणारे हिंदू आहेत की नाही ते तपासा, अशी मागणी करण्यात आली आहे. 

Updated: Oct 10, 2023, 03:32 PM IST
'गरबा कार्यक्रमात फक्त हिंदूंना प्रवेश द्या', विश्व हिंदू परिषदेची मागणी title=

Only Hindus Participate in Garba: नागपूरसह राज्यभरात गरब्यावरुन नवा वाद पेटण्याची शक्यता निर्माण झाली आहे. कारण 'गरबा कार्यक्रमात फक्त हिंदूंना प्रवेश द्या, अशी मागणी विश्व हिंदू परिषदेने केली आहे. प्रवेश देताना सर्वांचे आधार कार्ड तपासा, असे आवाहनही यावेळी करण्यात आले आहे. या मागणीला भाजप नेते नितेश राणे यांनी दुजोरा दिला आहे. विश्व हिंदू परिषदेच्या मागणीने नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. 

गरब्यावरुन नवा वाद पेटलाय. कारण गरबा कार्यक्रमात फक्त हिंदूंना प्रवेश द्या. गरबा कार्यक्रमासाठी प्रवेश देताना सर्वांचे आधार कार्ड तपासा अशी मागणी विश्व हिंदू परिषदेने केलीय. या मागणीनं नवा वाद निर्माण झालाय. गरबा कार्यक्रमात अनेक इतर धर्मीय तिथे प्रवेश घेतात आणि हिंदू महिला आणि तरुणींची छेड काढतात असा आरोप विश्व हिंदू परिषदेचे महाराष्ट्र आणि गोवा प्रांत मंत्री गोविंद शेंडे यांनी केलाय.

विश्व हिंदु परिषदेच्या मागणीला नितेश राणे यांनी दुजोरा दिला आहे. दांडिया खेळायला येणारे हिंदू आहेत की नाही ते तपासा, अशी मागणी भाजप आमदार नितेश राणेंनी केलीय. तर शिंदे गटानंही नितेश राणेंच्या मागणीचं समर्थन केलंय.  

दरम्यान या निर्णयानंतर खासदार संजय राऊत यांनी भाजपवर टिका केली आहे. यापुढे मोदी मुस्लीम देशांच्या भेटीवर जाणार नाहीत का?  असा सवाल त्यांनी केला.