शिर्डीत धावपट्टीवरुन विमान घसरलं

Updated: May 21, 2018, 07:34 PM IST

शिर्डी : शिर्डी विमानतळावर एक मोठा अपघात होता होता टळला आहे. शिर्डी विमानतळावर विमानाचे लँडींग होत असताना विमान धावपट्टीवरुन अचानक घसरले.

धावपट्टीवरुन जवळपास १०० मीटर बाजुला हे विमान सरकलं आहे. विमानात ४५ प्रवासी प्रवास करत होते आणि हे सर्व प्रवासी सुखरुप आहेत. 

सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाही. मात्र, या प्रकारामुळे गोंधळाचं वातावरण निर्माण झालं होतं.