Video : धक्कादायक ! पुराच्या पाण्यातून गरोदर महिलेला खाटेवरुन नेण्याची वेळ

Pregnant Women Travel From Flood : एक धक्कादायक बातमी. धो धो पाऊस कोसळत होता. नदीला पूर आला होता. एका गरोदर महिलेला प्रसुदी वेदना सुरु झाल्याने कुटुंबात चिंतेचे वातावरण होते...

Updated: Jul 15, 2022, 02:29 PM IST
Video : धक्कादायक ! पुराच्या पाण्यातून गरोदर महिलेला खाटेवरुन नेण्याची वेळ title=

अकोला : Pregnant Women Travel From Flood : एक धक्कादायक बातमी. धो धो पाऊस कोसळत होता. नदीला पूर आला होता. एका गरोदर महिलेला प्रसुदी वेदना सुरु झाल्याने कुटुंबात चिंतेचे वातावरण होते. मात्र, भर पावसात आणि पुरातून या महिलेला डॉक्टरांकडे नेण्याची वेळ आली. त्यासाठी खाटेचा वापर करावा लागला.

राज्यात गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पावसाने कहर केला आहे. पावसामुळे राज्यातील काही नद्या इशारा पातळीच्या वर तर काही नद्या धोक्याच्या पातळीच्या वर वाहत आहेत. तर, नद्यांवरील पूल पाण्याखाली गेल्याने अनेक गावांचा संपर्क तुटला आहे. अशात नागरिकांना पुराच्या पाण्यातून जीवघेणा प्रवास करावा लागत आहे. अकोल्यातही अशीच एक घटना घडली. पुराच्या पाण्यातून प्रवास करत एका गरोदर महिलेला रुग्णालय गाठावे लागलं आहे. अकोला जिल्ह्यातील मूर्तिजापूर तालुक्यातल्या पोही-हिवर कोरडे-माना मार्गावर हा प्रकार घडला.

अकोल्याच्या मुर्तीजापुरातील पोही या गावात एका गरोदर महिलेला पुराच्या पाण्यातून खाटेवरून नेण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. हिवरा कोरडे मार्गावरील तापकळी नदीला आणि पोही ते माना मार्गावरील उमा नदीला पूर आल्याने मुर्तीजापूरला जाणं शक्य नव्हते. दोन्ही मार्गावरील पुलावर 5 फूट पुराचे पाणी होते. मात्र, महसूल विभाग आणि संत गाडगेबाबा आपत्कालीन बचाव पथकाने या महिलेला खाटेवरून घेऊन जात पूर ओलांडला.