अजित पवार यांचा भाजपवर हल्लाबोल, यांचे अटींचे सरकार!

अजित पवार यांनी राज्यातील शिवसेना-भाजप युतीच्या सरकारवर जोरदरा हल्लाबोल चढवला.  

Updated: May 17, 2019, 12:08 AM IST
अजित पवार यांचा भाजपवर हल्लाबोल, यांचे अटींचे सरकार! title=

पुणे : जिल्ह्यात आठ विधानसभा मतदार संघाचा आढावा राष्ट्रवादीचे नेते आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी घेतला. त्यानंतर त्यांनी राज्यातील शिवसेना-भाजप युतीच्या सरकारवर जोरदरा हल्लाबोल चढवला. कोणतेही काम असेल तर ते करत नाहीत. केवळ अटी टाकून ते काम कसे रखडले जाईल, असेच धोरण अवलंबते. हे सरकार अटींचे सरकार आहे. आरक्षणाला अट, चारा छावणीला अट,प्रवेशाला अट, प्रवेशाला अट यातून कोणाचंही भलं होणार नाही, अशी बोचरी टीका अजित पवार यांनी केली.

फक्त व्हिडीओ कॉन्फरसिंग करून दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना मदत होणार नाही. त्यासाठी प्रत्यक्ष फिल्डवर उतरावे लागेल. मात्र भाजपचे लोकप्रतिनिधी मंत्री फिल्डवर जायला घाबरतात. कारण अधिकारी त्याच ऐकत नाहीत. आचारसंहितेचा बावू करतायेत. अनेक अधिकारी लोकप्रतिनिधी प्रदेश दौऱ्यावर गेलेत, अशी सडकून टीका अजित पवार यांनी केली.

ईव्हीएम विषयी माझ्या मनात कुठलीही शंका नाही. ईव्हीएममध्ये दोष असता तर पाच राज्यात भाजप सरकार गेले नसते. पण काहींच्या मनात शंका आहे.  मोदीच ढगाचे, ईमेल, डिजिटल कॅमेरा विधान हास्यपद असल्याची टीका केली. ग्रामीण भागातील लोकांना पण न पटणारे, विधान करुन त्यांनी टीका केली.

पवार हे फिल्ड वरचे नेते - सुप्रिया सुळे 

दरम्यान, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार हे फिल्डवरचे नेते आहेत म्हणून ते फिल्ड वर असतात, असे प्रतिपादन खासदार सुप्रिया सुळे यांनी केले. पण काम कसं करायचं हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. केवळ फोन वरून दुष्काळाची माहीत घेणे म्हणजे अजब आहे, असे सांगत त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना जोरदार टोला लगावला. ईव्हीएम नकोच अशीच आमची भूमिका आहे. मुख्यमंत्री फडणवीस यांचा आवडता शब्द पारदर्शक आहे. पारदर्शकता पाहिजे तर ईव्हीएम नकोच, असे त्या म्हणाल्यात.