अजित पवार फ्रस्टेट झाले आहेत - गिरीश बापट

गिरीश बापट यांची अजित पवारांवर टीका

Updated: Sep 24, 2019, 08:12 PM IST
अजित पवार फ्रस्टेट झाले आहेत - गिरीश बापट title=

मुंबई : अजित पवार फ्रस्टेट झालेले आहेत, त्यांना आदर्श विरोधी पक्ष आणि नेता म्हणून काम करता आलेलं नाही असा घणाघाती आरोप भाजप खासदार गिरीश बापट यांनी केला आहे. अजित पवारांना स्वतःचा मुलगा सोडून कुणाचं कौतुक करता आलेलं नाही, असंही पिंपरी-चिंचवडमध्ये झालेल्या पत्रकार परिषदेत गिरीश बापट यांनी म्हटलं आहे. शहरातील ३ आमदार निवडून दिल्यास शास्तीकर माफ करण्याचं आश्वासन अजित पवारांनी दिलं होतं. त्यावर बापटांनी ही टीका केली आहे.

खासदार गिरीश बापट यांनी म्हटलं की, इतकी वर्ष सत्तेत राहण्याची सवय लागली, त्यांना आदर्श विरोधी पक्ष म्हणून काम करता येत नाही. कसं काम करायचं ते आमच्याकडून शिकावं. त्यांनी आम्हाला आमच्या चुका दाखवल्यास त्याचं स्वागत करेल. त्यांच्या सूचनेचं देखील स्वागत करेल. पण, प्रश्नही समजून घेतले पाहिजेत. जे तुम्हाला १५-२० वर्षात करता आलं नाही, ते आम्ही १५-२० महिन्यात सुरू करून दाखवलं. याचं त्यांनी कौतुक करायला हवं. अशी टीका देखील त्यांनी यावेळी केली.

.