तहसीलदार ज्योती देवरेंचा आत्महत्येचा इशारा, व्हीडिओ क्लिप व्हायरल..

आमदार निलेश लंकेंकडून महिला तहसीलदाराला त्रास?

Updated: Aug 20, 2021, 04:27 PM IST
तहसीलदार ज्योती देवरेंचा आत्महत्येचा इशारा, व्हीडिओ क्लिप व्हायरल..  title=

अहमदनगर: अहमदनगरमधून सर्वात धक्कादायक बातमी समोर येत आहे. नगरच्या महिला तहसीलदाराने आत्महत्येचा इशारा दिला आहे. वरिष्ठ आणि लोकप्रतिनिधींच्या त्रासाला वैतागलेल्याचा दावा करत तहसीलदाराने आत्महत्या करण्याचा इशारा दिला आहे. यासंदर्भातील एक ऑडिओ क्लिप समोर आली आहे. या घटनेमुळे नगर जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली. 

तहसीलदार ज्योती देवरे यांचा आत्महत्येचा इशारा दिला आहे. आमदार निलेश लंकेंकडून महिला तहसीलदाराला त्रास होत असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. अहमदनगर येथील पारनेर तहसीलदारांची कथित ऑडियो क्लिप वायरल झाली. ऑडिओ क्लीप समोर येताच मोठी खळबळ उडाली आहे. 

तहिसदार ज्योती देवरे यांचा ऑडिओ क्लिप वायरल झाली. या ऑडिओ क्लीमध्ये त्यांनी आत्महत्येचा इशारा दिला आहे. या क्लिपमुळे पारनेरसह जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. या क्लिप मध्ये महिला अधिकारी म्हणून काम करत असताना नोकरीत होणारा त्रास आणि वरिष्ठांचे दुर्लक्ष या बाबत सविस्तर ज्योती देवरे यांनी सांगितलं आहे. इतकंच नाही तर लोकप्रतिनिधी कडून होणारा त्रास देखील त्यांनी सांगितला आहे. 

महिला तहसीलदाराची क्लीप मन सुन्न करणारी आहे. देवमाणूस म्हणून मिरवणा-या पारनेरच्या लोकप्रतिनिधीच्या नाकात वेसण घालणार का, असा सवाल भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी केला आहे. तर देवरे यांच्याविरुद्ध भ्रष्टाचाराचे आरोप असून, स्वतःच्या बचावाचा केविलवाणा प्रयत्न त्या करत आहेत, असं राष्ट्रवादीचे आमदार निलेश लंके यांनी स्पष्ट केलं आहे.

या ऑडिओ क्लिपवरून राजकारण सुरू झालं आहे. ही ऑडिओ क्लीप समोर आल्यानंतर आमदार निलेश लंके यांनी स्वतःवरील आरोप फेटाळून लावले आहेत. या प्रकरणी आता पोलीस तपासाकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.