Gautami Patil Video : आराराsss! 60 बाऊन्सर्स असतानाही गौतमी पाटीलच्या कार्यक्रमात हुल्लडबाजांचा धुडगूस

Gautami Patil : सोशल मीडियानं प्रसिद्धीझोतात आणलेल्या चेहऱ्यांमध्ये गौतमी पाटीलच्या नावाचाही समावेश आहे. डान्स व्हिडीओ असो किंवा मग रील्स, गौतमी एक ना अनेक कारणांनी चर्चेत आली.   

Updated: Feb 24, 2023, 01:10 PM IST
Gautami Patil Video : आराराsss! 60 बाऊन्सर्स असतानाही गौतमी पाटीलच्या कार्यक्रमात हुल्लडबाजांचा धुडगूस  title=
ahamednagar one more chaos at gautami patil dance event police came to control the crowd latest Marathi news

Gautami Patil : Instagram वर डान्स रीलमुळं आणि सबंध सोशल मीडियावर लावणीप्रकार सादर करत त्यातील अश्लील हावभावांमुळं वादाच्या भोवऱ्यात अडकलेलं नाव म्हणजे (Gautami Patil Dance Video) गौतमी पाटील. तिच्या लावणीमुळं बराच वाद झाला, तिच्यावर टीकेची झोडही उठली आणि या साऱ्यातून गौतमी बरीच चर्चेत आली. याच गौतमीच्या नुकत्याच पार पडलेल्या एका कार्यक्रमात पुन्हा एकदा गोंधळाची परिस्थिती पाहायला मिळाली. 

अहमदनगर (Ahamadnagar) येथील राहाता येथे एका वाढदिवसानिमित्त गौतमीच्या (Gautami Patil Dance programe) नृत्य कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. आता तिथं गौतमी येणार म्हटल्यावर होणारी गर्दीही अपेक्षित होती. गौतमी आली, तिनं Dance सुरु केला आणि पाहता पाहता टाळ्या, शिट्ट्या- किंकाळ्या सुरु झाल्या. हुल्लडबाजांनी या कार्यक्रमात दंगा करण्यास सुरुवात केली. अखेर परिस्थिती हाताळण्यासाठी पोलिसांना लाठीचार्ज करावा लागला. 

प्रेक्षकांची पळापळ, गौतमी ताबडबोत तिथून निघाली... 

गौतमी स्टेजवर असतानाच हुल्लडबाजांना रोखण्यासाठी पोलिसांनी लाठीचार्ज सुरु केला. हे पाहताच तिथं असणाऱ्या प्रेक्षकांनीही पळापळ सुरु केली. काही क्षणांतच कार्यक्रम स्थळाचं चित्र बदललं. गौतमी व्यासपीठावर असताना काही प्रेक्षकांनी पैसे उधळले. पण तिथं होणारा गोंधळ पाहून नाचता नाचता ती थांबली आणि म्हणून प्रेक्षकांनीही राडा घालण्यास सुरुवात केली. तिच्या विनंतीनंतरही हा राडा थांबलाच नाही. 

हेसुद्धा वाचा : Kolhapur News : कणेरी मठ लोकोत्सवाला गालबोट, 53 गायींचा तडफडून मृत्यू

 

अतिउत्साही प्रेक्षक आणि हुल्लडबाजांना आवरताना तिथं असणाऱ्या 60 बाऊन्सर्सचीही दमछाक झाली. अखेर पोलिसांनी घटनास्थळी येत लाठीचार्च केला. परिस्थिती हाताबाहेर गेल्याचं पाहून आयोजकांनीही कार्यक्रम आवरता घेतला आणि तिथं गौतमी ताबडतोब कार्यक्रम स्थळावरून निघाली. दरम्यान, गेल्या काही महिन्यांमध्ये गौतमीच्या प्रत्येक कार्यक्रमात अशीच परिस्थिती पाहायला मिळाली आहे. त्यामुळं आता गौतमीचा कार्यक्रम असला, की राडा होणार हे गणित चुकलेलं नाही. पण, आता यावर स्थानिक यंत्रणा काय निर्णय घेतात हे पाहणं महत्त्वाचं असेल.