Kolhapur News : एक धक्कादायक बातमी कोल्हापूर (Kolhapur )जिल्ह्यातील कणेरी मठावरील. (Kaneri Math Folk Festival) कणेरी इथल्या 'सुमंगलम' (sumangalam) पंचमहाभूत (panch mahabhoot) लोकोत्सवाला गालबोट लावले आहे. मठावरील गोशाळेतील सुमारे 53 गायींचा मृत्यूचा फूड पॉइसनने मृत्यू झाला आहे. सुमंगलम पंचमहाभूत लोकोत्सवातील शिळ अन्न खायला दिल्यानं गाईंचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची माहिती पशु संवर्धन विभागाकडून दिली आहे. (Kolhapur News In Marathi)
तब्बल 53 गाईंच्या मृत्यूने कणेरी इथ खळबळ उडाली आहे. इतकच न्हवे तर अजूनही जवळपास 33 गाईची प्रकृती अत्यवस्थ असून 33 गाईंना वाचवसाठी पशुसंवर्धन विभागाकडून शर्तीचे प्रयत्न सुरु आहे.. या सर्व सर्व गाई कणेरी मठावरील गो शाळेतील आहेत. या सुमंगलम कार्यक्रमाला राज्य सरकार देखील प्रयोजक आहेत.
हा महोत्सव 26 फेब्रुवारीपर्यंत चालणार आले आहे. पृथ्वी, पाणी, हवा, तेज, आकाश अशा पंचमहाभूतांवर (panch mahabhoot) आधारित भव्य सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. यात परिषद, प्रदर्शन व प्रवर्तन असे या सोहळ्याचे स्वरुप आहे. श्री क्षेत्र सिद्धगिरी महासंस्थांच्यावतीने अद़ृश्य काडसिद्धेश्वर स्वामीजी यांच्या संकल्पनेतून सुमंगलम पंचमहाभूत हा पर्यावरण जनजागृती करणारा उत्सव सुरु आहे.
कणेरी मठातील महोत्सवाच्या तिसर्या दिवशी दुपारी बारा वाजता अचानक गोठ्यातील गायींना त्रास होऊ लागला. त्यानंतर त्यांचा मृत्यू झाला. या उत्सवाच्या निमित्ताने जिल्ह्याचे पशुवैद्यकीय पथक कार्यक्रमस्थळी उपस्थित होते. या पथकाकडून गाईंवर उपचार केले. मात्र दरम्यान काही गायी मृत्युमुखी पडल्या. गेले दोन दिवस पशुवैद्यकीय पथक गाईंवर उपचार करीत आहे. परंतु यातील किती गाई दगावल्या याबद्दल अद्याप कुणी माहिती दिलेली नाही.
गुरुवारी दुपारनंतर गाईंना त्रास जाणवू लागला. केवळ गोठ्यातील गायींचा मृत्यू झाला आहे. आत्तापर्यंत 12 गाई दगावल्या असून विषबाधा झालेल्या गाईंवर 22 डॉक्टर, 30 कर्मचारी उपचार करीत आहेत, अशी माहिती कोल्हापूर पशुसंवर्धन जिल्हा उपायुक्त वाय. ए. पठाण यांनी दिली.