मुंबई : लांब पल्ल्याच्या एक्सप्रेस बंद केल्यानंतर आज मध्यरात्रीपासून लोकल सेवा देखील ३१ मार्चपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेणार आहे. अत्यावश्यक सेवेतील कामगारांसाठी तेवढ्या बस सुविधा देण्याचा विचार प्रशासन करत आहे. थोड्याच वेळात यासंदर्भात निर्णय जाहीर होऊ शकतो.
ज्यांच्या हातावर शिक्के मारले आहेत असे प्रवासी देखील रेल्वे प्रवास करताना आढळले. हे प्रवासी हजारोंच्या संपर्कात येऊन कोरोना अधिक पटीने पसरेल ही भीती राज्य सरकारला आहे. त्यामुळे आता रेल्वे पाठोपाठ एसटी देखील बंद होण्याची शक्यता आहे. लवकरच यासंदर्भातील अधिकृत घोषणा होण्याची शक्यता आहे.
प्रशासनाने वारंवार सुचना करुनही रेल्वेमध्ये गर्दी करणाऱ्या नागरिकांच्या वाढत्या प्रमाणामुळे कोरोनाची लागण होण्याची वाढती शक्यता पाहता अखेर प्रशासनाला मुंबई लोकल थांबवण्याचा हा निर्णय घ्यावा लागला आहे. मुंबईची लोकल सेवा जवळपास ३१ मार्चपर्यंच बंद राहणार आहे. तर, मालवाहतूक काही महत्त्वाच्या कारणांमुळे सुरु ठेवण्यात येणार आहे.
सध्याच्या घडीला प्रवासासाठी निघालेले सर्व प्रवासी इच्छित स्थळी पोहोचतील याची दखलही रेल्वे मंत्रालयाकडून घेण्यात येत आहे.
रात्री बारा वाजल्यानंतर मुंबईची लोकलसेवा पूर्णपणे ठप्प होणार असल्यामुळे नागरिकांनी किमान आततरी परिस्थितीचं गांभीर्य घेत कोरोनाला रोखण्यासाठी हातभार लावावा असं आवाहन करण्याच येत आहे.
दरम्यान नागरिकांची गर्दी कमी करण्यात यश न मिळाल्यास नाईलाजाना शहर लॉकडाऊन करण्याचा निर्णय घ्यावा लागेल असा इशारा पालकमंत्री अस्लम शेख यांनी दिला आहे.
देशात कोरोना विषाणूचा धोका पाहता भारतीय रेल्वेकडून महत्त्वाचा निर्णय़ घेतला गेला. ३१ मार्चपर्यंत देशातील रेल्वेसेवा बंद ठेवण्याचा निर्णय रेल्वे मंत्रालयाने घेतला आहे. या निर्णयाअंतर्गत प्रवास पूर्ण झालेल्या गाड्या त्वरित थांबवण्यात येतील. सध्या 400 मालगाड्या धावत आहेत आणि या रेव्ले गाड्या ठरलेल्या स्थानकावर पोहोचल्यानंतर ते बंद केल्या जातील. कोरोना विषाणूचा वाढता धोका लक्षात घेता रेल्वे बोर्डाने हा निर्णय घेतला आहे.