निराधार योजनेचे पैसे मिळवताना ज्येष्ठ नागरिकांची परवड

वयाच्या सत्तरी वर्षाच्या काळात सुख मिळणाऱ्या पायाचे उंबरठे झीजवावे लागतायत

Updated: Jan 30, 2021, 06:53 PM IST

मिलिंद आंडे, झी मीडिया, वर्धा : वयोवृद्ध नागरिकांसाठी म्हातारपणात उपास पडू नये म्हणून शासनाकडून निराधार योजना लागू करण्यात आली आहेय...या निराधार लोकांना महिन्याचे १ हजार रुपये दिले जातेय. मात्र हेच पैसे त्यांना मिळण्यासाठी जीवाचे हाल करावे लागत असेल आणि वयाच्या सत्तरी वर्षाच्या काळात सुख मिळणाऱ्या पायाचे उंबरठे झीजवावे लागत असेल तर ते आधार देणाऱ्या शासकीय पैसे काय कामाचे असा सवाल उपस्थित होतो.

वर्धा तालुक्यात जवळपास 24 हजार लाभार्थ्यांना संजय गांधी, श्रावण बाळ, इंदिरा गांधी या योजने द्वारे प्रत्येक महिन्यात लाभ दिला जातो.. आणि शासन निर्णय प्रमाणे सर्व लाभार्थ्यांना दरवर्षी हयात प्रमाणपत्र द्यावे लागते.. निराधार लाभार्थी जिवंत आहे की नाही म्हणून हयात प्रमाणपत्र तहसील कार्यालयात द्यावे लागतेय..पण या कार्यालयात आजीने आणलेले हयात प्रमाणपत्र स्वीकाराला अधिकारी,कर्मचारी जागेवर नसल्याने आजीला अनेक चकरा माराव्या लागल्या.

या कार्यालयाने सत्तरी पार असलेल्या आजीच्या पायाचे उंबरडे झिजविण्यासाठी मजबूर केलेय..या वृद्ध आजीला सतत तीन ते चार दिवसापासून चकरा मारायला लावल्याच स्पष्ट झाले आहेय.

या तहसील कार्यालयात  अधिकारी नागरिकांच्या कामाला नेहमीच उशीर,किंवा नागरिकांना विनाकारण अडकवून देण्याच्या घटना अनेकदा समोर आल्याय..नागरिकांना ताटकळत ठेवणे ही या कार्यालयाला लागलेली सवय गेल्या अनेक दिवसांपासून आहेच.

नागरिकांना विनाकारण ताटकळत ठेवणे किंवा कामाच्या वेळेवर कार्यालयात हजर न राहता बाहेर निघून जाणे,कार्यालयात उपजिल्हाधिकारी महसुलचे वरिष्ठ अधिकारी,तहसीलदार आणि नायब तहसीलदार या अधिकाऱ्यांच्या देखील गप्पा गोष्टीच्या चर्चा चांगल्यास रंगत आहेय.

चर्चेच्या नावांवर एक एक तास चाय पे चर्चा, विनाकारण नागरिकांना त्रास देणे हा प्रकार कुठेतरी थांबला पाहिजे आणि सर्व सामान्य नागरिकांचे काम वेळेत झाले पाहिजे.. नेहमीच अधिकाऱ्यांच्या खुर्च्या रिकाम्या अवस्थेत बघायला मिळाल्या आहेय..नागरीकांचे वेळेत काम न करणाऱ्या  वरिष्ठ अधिकारी,कर्मचारी यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल झाले पाहिजे अशी मागणी आता जोर धरते आहे.

जिल्ह्यात काम चुकारू अधिकारी अनेक आहेत.कोणत्या न कोणत्या बहाण्याने अधिकारी दालनातून गायब होत असतात..जिल्हाधिकारी मुंबईला कामानिमित्त गेले असता जिल्ह्याचे १८  वरिष्ठ अधिकारी चक्क कार्यालयीन वेळेत बोरधरणच्या आतील हॉटेल मध्ये जाऊन पार्टी केल्याची चर्चा जिल्ह्यात सुरू आहेय..कुत्र्यांचा वावर तहसील कार्यालय मध्ये होऊ शकतो.पण नागरिकांचे काम लवकर होत नाहीत..ही अतिशय खेदनीय बाब आहेय..जिल्हाधिकारी यांनी लवकरात लवकर लक्ष देऊन असे प्रकार थांबवावे अशी मागणी करण्यात येत आहेय.

जिल्ह्याचे अधिकारी आणि कर्मचारी कामचुकारपणा करण्यात चांगलेस पटाईत आहेत..पालकमंत्री सुनील केदार यांनी लवकरात लवकर अधिकाऱ्यांना धारेवर धरून अडकत असलेल्या गोर-गरीब,गरजू,कष्टकरी,शेतकरी यांच्या कामांना प्राधान्य देऊन जनतेला न्याय द्यावा हीच अपेक्षा..!