वारीसाठी निघालेल्या भाविकांवर काळाचा घाला, 30 जण जखमी

आळंदीला निघालेल्या भाविकांचा भीषण अपघात, जखमींवर स्थानिक रुग्णालयात उपचार सुरू

Updated: Jun 19, 2022, 11:16 AM IST
वारीसाठी निघालेल्या भाविकांवर काळाचा घाला, 30 जण जखमी title=

सातारा : वारीसाठी निघालेल्या भाविकांवर काळानं घात केला. शिरवळ जवळ महामार्गावर वारकऱ्यांच्या ट्रॉलीला भीषण अपघात झाल्याची माहिती मिळाली आहे. या अपघातात 30 वारकरी जखमी झाले आहेत. तर एका भाविकाचा मृत्यू झाल्याची माहिती मिळाली. 

जखमींमध्ये कोल्हापूर जिल्ह्यातील भादोले आणि लाहोटे इथले वारकरी असल्याची माहिती मिळाली. पहाटेच्या सुमारास हा भीषण अपघात झाला. त्यामुळे मदत मिळण्यासही थोडा विलंब झाला. या वारकऱ्यांना स्थानिक रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे. 

हे सर्व वारकरी आळंदीला निघाले होते. वारीसाठी निघालेल्या वारकऱ्यांवरवर काळाने घात केला. पण दैव बलवत्तर म्हणून मोठा अनर्थ टळला आहे. जखमींवर शिरवळच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार सुरू आहेत.