पोलीस भरती संदर्भात आताची सर्वात मोठी बातमी, वाचा कधी होणार भरती

पोलीस भरतीसाठी कशी होणार परीक्षा? कधीपासून सुरू होणार भरती पाहा सर्व अपडेट्स 

Updated: Jun 19, 2022, 09:43 AM IST
पोलीस भरती संदर्भात आताची सर्वात मोठी बातमी, वाचा कधी होणार भरती title=

मुंबई : राज्यातील सर्वात महत्त्वाची बातमी आहे. पोलीस भरतीसाठी जे तरुण अर्ज करणार आहेत त्यांच्यासाठी ही महत्त्वाची आहे. पोलीस भरतीसाठी पहिल्यांदा मैदानी चाचणी होणार असल्याची सूत्रांकडून माहिती मिळाली आहे. 

जुलै-ऑगस्टमध्ये 7 हजार 231 पदांची पोलीस भरती होणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. पोलीस भरतीबाबत गृह विभाग मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत आहे. 

महाविकास आघाडी सरकारने भरती पद्धतीत बदल करून सर्वप्रथम मैदानी चाचणी घेण्याचा निर्णय घेतल. जेणेकरून ग्रामीण तरूणांना पोलीस भरतीत सर्वाधिक संधी मिळेल हा हेतू होता. पण, त्याची अंमलबजावणी आता आगामी भरतीवेळी केली जाणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. 

- पोलिस भरतीसाठी पहिल्यांदा द्यावी लागणार मैदानी चाचणी
- राज्याच्या गृह विभागात तब्बल 49 हजार 500 पदे रिक्त
- पहिल्या टप्प्यात 2020 मधील 7 हजार 231 पदांची भरती होणार 
- पुढील टप्प्यात 2021 आणि 2022 मधील रिक्तपदांची एकत्रित भरती होणार 
- पोलिस नाईक झालेले होणार हवालदार; गृह विभागाने रद्द केले नाईक पद

यापूर्वीच मागील काही वर्षांमध्ये पोलीस भरती करण्याचे नियोजन झाले होते. पण मध्यंतरी कोव्हिडमुळे दीड ते दोन वर्ष पूर्ण क्षमतेने पोलीस भरती झाली नव्हती. राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी मागील अर्थसंकल्पीय अधिवेशनात पोलीस भरती करण्याबाबत सूचक वक्तव्य केलं होतं.