True Friendship : याला म्हणतात जिगरी दोस्त! मित्रासाठी जे काही केले ते पाहून डोळ्यात पाणी येईल

दुःख अडवायला उभाऱ्यासारखा, मित्र वनव्यामध्ये गारव्यासारखा... पंढरपुरमध्ये (Pandharpur) मित्राने मित्राचा जीव वाचवण्यासाठी घेतलेली धडपड आणि त्याचे प्रयत्न पाहून कवी अनंत राऊत यांची ही कविता आठवत आहे (True Friendship).

Updated: Feb 27, 2023, 09:55 PM IST
True Friendship : याला म्हणतात जिगरी दोस्त! मित्रासाठी जे काही केले ते पाहून डोळ्यात पाणी येईल title=

सचिन कसबे, झी मीडिया, पंढरपूर : खरी मैत्री (True Friendship) काय असते ते पंढरपूरचे उद्योजक अभिजित पाटील (Abhijit Patil) यांनी दाखवून दिले आहे. आजारी मित्राला मुंबईला उपचारासाठी नेण्यासाठी अभिजीत यांनी थेट एअर अ‍ॅब्युलन्सची (air ambulance) व्यवस्था केली.  उद्योजक अभिजित पाटील यांच्या दोस्तीची जोरदार चर्चा रंगली आहे. 

श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे संचालक दत्तात्रय नरसाळे हे चार दिवसापासून सोलापूर मधील रुग्णालयात आजारी होते. प्रकृती खालावल्याने पुढील उपचारासाठी त्यांना तातडीने मुंबईला नेणे गरजेचं होत. यासाठी त्यांचे मित्र आणि श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन अभिजित पाटील यांनी मित्रासाठी खास एअर अ‍ॅब्युलन्सची व्यवस्था केली. या माध्यमांतून आज सायंकाळी उपचारासाठी नरसाळे यांना मुंबईमधे नेण्यात आले.

पंढरपूर तालुक्यातील गुरसाळे मधील  श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन अभिजीत पाटील यांचे जळोली गावचे सहकारी मित्र व विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे संचालक दत्तात्रय नरसाळे यांना मागील चार पाच दिवसापासून पोटदुखीचा त्रास होत असल्यामुळे सोलापूर येथील आश्विनी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. 

नरसाळे यांना चार पाच दिवसापासून पोटदुखी चा त्रास जाणवत होता. पंढरपुर येथील एका हॉस्पिटलमध्ये दोन दिवस उपचार घेतल्यानंतर त्यांना सोलापूर येथील आश्विनी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. पोटदुखी आजाराच्या काही शस्त्रक्रियेनंतर त्यांची तब्येत खालावली होती. पोटात आतड्यात संसर्ग अधिक असल्यामुळे ऑपरेशन केले होते. त्यांचे मित्र अभिजीत पाटील यांनी मुंबई येथील चांगल्या हॉस्पिटलमधील तज्ञ डॉक्टरांचे सल्ले घेतले. पोटातील आतड्याच्या ऑपरेशनमुळे ट्रान्सप्लान्ट करणे आवश्यक होते. त्यानुसार नरसाळे यांना तातडीने मुंबईला उपचारासाठी नेणे गरजेचे होते. आपल्या मित्राला तातडीने उपचार मिळावे यासाठी अभिजित पाटील यांनी तातडीने एअर अ‍ॅब्युलन्स ची व्यवस्था केली.

डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार त्यांनी सोलापूर अश्विनी हॉस्पिटल येथून आज दुपारी चार वाजता अ‍ॅम्बुलन्स विमानाने आपल्या मित्राला घेऊन स्वतः अभिजीत पाटील मुंबईत दाखल झाले. एका साखर कारखान्याचा चेअरमन असतानाही अभिजित पाटील यांनी मैत्रीत कसलही अंतर न आणता आपल्या मित्रासाठी आणि मैत्रीसाठी कसलाही विचार न करता समय सूचकता दाखवत निर्णय घेतला. त्यांच्या या मैत्रीची सध्या कौतुकाने चर्चा सुरू आहे.