जयेश जगड, झी मीडिया, अकोला : शंकराने तिसरा डोळा उघडला जगाचा विनाश होईल... असे भाकित नेहमीच वर्तवले जाते. अशातच एक वेगळ्याच प्रकाराची अकोला शहारात चर्चा रंगली आहे. येथील एका शिव मंदिरात महादेवाच्या पिंडीला डोळे आले असल्याचा दावा केला जात आहे (Shankar temple in Akola city). ही चर्चा सर्वत्र वाऱ्यासारखी पसरली आहे. यानंतर या मंदिरात शंकाराच्या पिंडीचे दर्शन घेण्यासाठी भाविकांची रीघ लागली आहे.
अकोला शहरामध्ये असलेल्या गिता नगर भागातील अकोली बु.येथील शिव मंदिरात हा प्रकार घडला आहे. महादेवाच्या मंदिरात पिंडीला अचानक डोळे दिसत असल्याचे समजताच भाविकांचा मोठा गोंधळ उडालाय. यामुळे मंदिरासमोर भक्त गर्दी करत असल्याचे पाहायला मिळत आहे. परंतु ही अफवा असल्याची चर्चा सुध्दा नागरिकांमधे सुरु आहे.
ही वार्ता वाऱ्यासारखी पसरताच महिला मंदिरात धाव घेऊ लागल्या आहेत. काही महिलांनी श्रद्धेपोटी महादेवाच्या पिंडीवरील तिसरा डोळाच उघडल्याचे सांगितल्याने गर्दीत आणखीनच भर पडली आहे.
अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे शरद वानखडे यांनी हा दावा खोटा असल्याचे सांगितले आहे. कुणीतरी जाणून-बुजून खोडसाळपणा केला असेल असेही ते म्हणाले. त्यामुळे नागरिकांनी कुठल्याही अंधश्रद्धेला बळी पडू नये आणि मंदिरात गर्दी करुन नये असे आवाहनही त्यांनी केले आहे.
हिंदू धर्मात शंकराची उपासना (Lord Shiva) करणे अत्यंत कल्याणकारी मानले जाते. शंकराची आराधना (Lord Shiva Worship) करणार्यांना आयुष्यात कोणत्याही प्रकारचं भय नसतं, असं मानलं जाते. मनोभावे पूजा करणाऱ्यांना शिवाच्या कृपेने जीवनात सर्व प्रकारचे सुख आणि यश प्राप्त होतं. सोमवार (Somwar) हा भगवान शिवाला समर्पित आहे. मात्र, शंकराची पूजा करताना काही गोष्टी टाळा. भगवान शंकराच्या पूजेमध्ये तुळशीचं पान (basil leaves) अर्पण करू नये. असं केल्यानं तुम्हाला तुमच्या उपासनेचं फळ मिळत नाही. शंकराची पूजा करताना शंखाचा (shell) वापर करू नये. शिवाने शंखचूड नावाच्या राक्षसाचा वध केला होता. म्हणूनच शिवपूजेत शंख वापरला जात नाही असे मानले जाते. भगवान शंकराची (Lord Shiva) पूजा करताना लाल रंगाचे कोणतेही साहित्य वापरू नये. त्याचबरोबर भगवान शंकराला नारळाचं पाणी (coconut water) अर्पण करू नये. केतकीचं फूल भगवान शंकराची पूजा करण्यासाठी शापित मानलं जातं. भगवान शंकराची पूजा करताना केतकीच्या फुलांचा (ketki flower) वापर करू नये.