इथं दुनियादीरी नाही गुन्हेगारी चालते; रील बनवाणाऱ्या बादशाहला पुणे पोलिसांनी चांगलाच गुलाम बनवला

रिलच्या माध्यमातून एका तरुणाने चक्क पुणे पोलिसांना आव्हान दिले होते.  हे हडपसर गाव आहे इथे दुनियादारी नाही गुन्हेगारी चालते असं म्हणत या तरुणाने पोलिसांना इशारा दिला होता.  

Updated: Aug 22, 2023, 05:49 PM IST
इथं दुनियादीरी नाही गुन्हेगारी चालते; रील बनवाणाऱ्या बादशाहला पुणे पोलिसांनी चांगलाच गुलाम बनवला title=

Pune Crime news : पुण्यातील एक तरुण सोशल मीडियावर रील्स बनवत होता. आपल्या रील्सच्या माध्यमातून त्याने पुणे पोलिसांना चॅलेंज दिले होते. या तरुणाला पुणे शहर पोलिसांनी अटक केली आहे. हे हडपसर गाव आहे, इथं दुनियादीरी नाही गुन्हेगारी चालते'  या तरुणाने बादशाह नावाचं रिल्स बनवून थेट पुणे पोलिसांनाच आव्हान दिले होते. 

हडपसर मधील या तरुणाने सोशल मीडियावर एक रील्स बनला होता. त्या रिल्समध्ये तरुण म्हणतो, ''हे हडपसर गाव आहे, इथं दुनियादीरी नाही गुन्हेगारी चालते''. या तरुणाने बादशाह नावाचं रिल्स बनवून थेट पुणे पोलिसांचा आव्हान दिलं होते. याची पुणे शहर पोलिसांनी दखल घेत त्याला अटक केली. पवन संतोष भारती असे अटक केलेल्या तरुणाचे नाव आहे. 

पवन हा तरडेवाडी मोहम्मदवाडी येथे राहणारा आहे.  सोशल मीडियावर त्याने गुन्हेगारीचे स्टेटस ठेवले होते. त्याचे हे स्टेटश आणि रिल्स व्हायरल झाल्यांनतर पुणे शहर पोलीस दलातील युनिट सहाच्या पथकाने अटक केली आहे. 

सोशल मिडियावर फेसम होण्यासाठी तरुणांचे नको ते उद्योग

सोशल मीडियावर लोकप्रियता मिळवण्याकरता कोण काय करेल याचा काही नेम नाही? पुण्यातील हडपसर मधील एका तरुणाने रिल्समधून थेट पुणे पोलिसांना आव्हान दिलं होते.    इंटरनेटवर असंख्य तरुणांमध्ये इन्स्टा रिल्सची खूप क्रेझ आहे. सोशल मीडियावर रील बनवून फेमस होण्याचे प्रकार वाढले आहेत. मात्र यामुळे अनेकदा हातात घातक शस्त्रांचा वापर करुन रील बनवण्याचे प्रकारही वाढले आहेत.पुण्यात तरुणांकडून सोशल मीडियाच्या माध्यमातून गुन्हेगारीचे उदातीकरण करण्यात येत असून ही चिंतेची बाब बनली आहे.

पुण्यात 1 कोटींचं अफीम जप्त 

विद्येचं माहेरघर अशी ओळख असलेल्या पुण्यात 1 कोटींचं अफीम जप्त करण्यात आले आहे. पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या अमली पदार्थ विरोधी पथकानं 3 जणांना अटक केलीय. सुमेर जयरामजी बिष्णोई, चावंडसिंग मानसिंग राजपूत, लोकेंद्रसिंह महेंद्रसिंग राजपूत अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावं आहे.पुण्यातील गोकुळनगर भागात राजस्थानची टोळी अफीमची विक्री करत असल्याची पोलिसांना माहिती मिळाली होती. त्याआधारे पोलिसांनी छापा टाकून 3 किलो 214 ग्रॅम अफीम जप्त केलं. आता ही टोळी नेमकी कुणाला अफीमची विक्री करायची याचा पोलीस शोध घेत आहेत.