गर्लफ्रेंडला लॉजवर घेऊन गेला नागपूरचा बॉयफ्रेंड, सकाळी झाला मृत्यू; 'हे' होतं कारण!

Nagpur Youth Died:दिवसभर शहरात फिरुन झाल्यानंतर संध्यकाळी हिरणवार लॉज येथे मुक्कामी थांबण्याचा निर्णय त्यांनी घेतला. यावेळी तरुणांनी शक्ती वर्धक गोळ्या घेतल्या होत्या. 

Pravin Dabholkar | Updated: Aug 22, 2023, 05:45 PM IST
गर्लफ्रेंडला लॉजवर घेऊन गेला नागपूरचा बॉयफ्रेंड, सकाळी झाला मृत्यू; 'हे' होतं कारण! title=

प्रविण तांडेकर, झी 24 तास, भंडारा: एका तरुणीसोबत लॉजमध्ये गेलेल्या तरुणाचा अचानक मृत्यू झाला. ही घटना भंडारा शहरातील हिरणवार लॉजमध्ये घडली आहे. या घटनेमुळे विविध चर्चांना उधाण आले आहे. नेमका कशामुळे झाला याबद्दल अनेक तर्कवितर्क लावले जात होते. आता यासंदर्भात महत्वाची अपडेट समोर आली आहे.

आजच्या तरुण तरुणाई मध्ये डेट करण्याचा प्रमाणत हल्लीच्या काळात वाढत आहे. घरून मित्र किंवा मैत्रिणीकडे जातो म्हणून आजकालची मुले फिरायला जातात. इतकचं नव्हे तर मम्मी रात्र झाली मी मैत्रिणीच्या घरीच थांबते असे बोलून खोट बोलण्याचे प्रकारही समोर येतात. असाच काहीसा प्रकार भंडारा जिल्ह्यात घडला असून तरूणाला आपला जीव गमवावा लागला आहे. 

क्रिष्णा रायभान धनजोडे असे या तरुणाचे नाव असून तो नागपूर जिल्ह्यातील कामठीच्या केशोरी येथे राहायचा. क्रिष्णाचे गोंदिया जिल्ह्यातील अर्जुनी-मोरगाव तालुक्यातील जरफडा येथील एका २३ वर्षीय तरुणीशी प्रेमसंबंध होते. २० ऑगस्ट रोजी हे दोघेही भेटण्याकरिता भंडाऱ्याला आले होते. 

दिवसभर शहरात फिरुन झाल्यानंतर संध्यकाळी हिरणवार लॉज येथे मुक्कामी थांबण्याचा निर्णय त्यांनी घेतला. यावेळी तरुणांनी शक्ती वर्धक गोळ्या घेतल्या होत्या. अचानक रात्री दोघेही झोपी गेले पण मध्यरात्री तरुणी झोपेतून उठली असता तिने क्रिष्णाला आवाज देऊन उठविण्याचा प्रयत्न केला. पण त्याने काहीच हालचाल केली नाही. 

यानंतर मुलगी घाबरली आणि लॉज मधील कर्मचाऱ्यांना आवाज देऊ लागली. यानंतर सगळ्यानी मिळून भंडारा येथील शासकीय रूग्णालयात उपचारासाठी दाखल केले पण आधीच क्रिष्णाचा मृत्यू झाला होता. त्यामुळे डॉक्टरांनी मृत घोषित केले. या संदर्भात भंडारा पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून अधिक तपास करीत आहेत.

एक कपल हॉटेल थांबले होते. दुसऱ्या दिवशी सकाळी त्याच्या पोटात आणि छातीत दुखत होते. त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले. पण त्याचा मृत्यू झाला. मृत्यूचे नेमके कारण कळाले नाही. पण मृतकाच्या शेजारी काही गोळ्या दिसून आल्या त्या गोळ्या नक्की कशाच्या आहेत? याचा तपास सुरु असल्याची प्रतिक्रिया भंडाऱ्याचे पोलीस निरीक्षक गोकुल सूर्यवंशी यांनी दिली.