Accident News : भीमाशंकर हे 12 ज्योतीर्लिंगांपैकी (Bhimashankar News) एक आहे. केवळ महाराष्ट्रच नाही तर देशभरातील भाविकांचे श्रद्धास्थान आहे. अनेक प्रवासी भीमाशंकरच्या दर्शनासाठी येत असतात. अशातच उत्तर प्रदेशातून (Uttar Pradesh ) भीमाशंकराच्या (Bhimashankar) दर्शनासाठी आलेल्या भाविकांच्या वाहनाला भीषण अपघात (terrible accident ) झाला आहे. या अपघातात दोघांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर, आठ प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत. अगदी भीमाशंकर जवळ पोहचून यांना दर्शन घेता आले नाही.
नगर-कल्याण महामार्गावर जुन्नर तालुक्यातील बेल्हे येथे हा अपघात झाला आहे. पीकअप आणि आयशर टेम्पो यांच्यात समोरासमोर जोरदार धडक होऊन भीषण अपघात झाला. या अपघातात पीकअपचा चालक आणि एका महिलेचा जागीच मृत्यू झाला आहे. तर, पीकअप मधील सात ते आठ जण गंभीर जखमी झाले आहेत.
जखमींवर आळेफाटा येथील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. हे सर्व जण उत्तर प्रदेशातील भाविक असून ते भीमाशंकराच्या दर्शनासाठी निघाले होते. भीमाशंकराचे मंदित अगदी जवळ आले असताना हा अपघात झाला. स्थानिक नागरिकांच्या मदतीने तातडीने जखमींना रूग्नालयात दाखल करण्यात आले.
नागपूर अमरावती महामार्गावरही भीषण अपघात झाला आहे. कोंढाळीजवळ खैरी शिवारत ट्रक आणि कारची धडक होऊन हा भीषण अपघात झाला. या अपघातात दोघांचा जागीच मृत्यू झाला. आदित्य माने आणि बिसेन मराठे अशी मृतकांची नावे आहेत. आदित्य हा बालाघाट येथील येथील बिसेन हा हा पुण्याचा राहणारा आहे. रितू पंचेश्वर आणि संतलाल पंचेश्वर अशी जखमींच नाव आहेत. कारची परिस्थिती पाहता अपघाताची भीषणता लक्षात येते.
कोंढाळी पोलीस स्टेशनच्या हद्दीतील खैरी शिवारत सकाळी 10 वाजातचं सुमारास हा अपघात झाला. महामार्गवर रस्ता दुरूस्तीचं काम सुरू असल्यानं एकाच बाजूने ये-जा वाहतूक सुरू होती. मात्र, दोन्ही वाहन भरधाव असल्यानं सामोरा समोर धडक झाली.
जखमींना तात्काळ नागपूरला रवाना करण्यात आले. दोघांचे मृतदेह हे काटोलला शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आल्याची माहिती पोलीस अधिकारी पंकज वाघोडे यांनी दिली. ट्रक चालक घटनास्थळावरुन पसार झाला असून क्लिनर पोलिसांच्या हाती लागला आहे.