महिला दिनाच्या पूर्वसंध्येला धक्कादायक घटना झाली उघड

आरोग्य केंद्रावर आईनेच केली मुलीची डिलिव्हरी ....  

Updated: Mar 6, 2023, 07:50 PM IST
महिला दिनाच्या पूर्वसंध्येला धक्कादायक घटना झाली उघड title=
यशोदा आणि तिची आई

सोनू भिडे, नाशिक:- 

८ मार्च हा दिवस जागतिक महिला दिन म्हणून साजरा केला जातो. या दिवशी महिलांचा गौरव देखील केला जातो. मात्र महिला दिवस सोडला तर महिलांना दुर्लक्षित केल जात कि काय.... असा प्रश्न  पडतो... प्रसूतीसाठी रुग्णालयात गेलेल्या महिलेची प्रसूती तिच्या आईनेच केली आहे. प्राथमिक आरोग्य केंद्रात आरोग्य अधिकारी आणि कर्मचारी नसल्याने आईलाच मुलीची प्रसूती करावी लागल्याचा आरोप केला जात आहे. दोन दिवसानंतर जागतिक महिला दिन साजरा होणार असताना हि घटना घडल्याने सर्वत्र संताप व्यक्त केला जात आहे. 

काय आहे घटना...

त्र्यंबकेश्वर तालुक्यातील बरड्याचीवाडी येथील यशोदा आव्हाटे ह्या गरोदर होत्या. रविवारी तिला  प्रसूती कळा सुरू झाल्यान आई आणि यशोदा जवळच असलेले  जिल्हा परीषदेच अंजनेरी  प्राथमिक आरोग्य केंद्रावर दाखल झाले. यावेळी रुग्णालयात आरोग्य अधिकारी आणि कर्मचारी नसल्याने यशोदाची आई आणि दोन महिलांनी मिळून प्रसूती केली आहे. यशोदाने गोंडस मुलीला जन्म दिला असून आई आणि बाळ सुखरूप आहे. 

या कारणासाठी करावी लागली आईला मुलीची प्रसूती

आरोग्य विभागाचा भोंगळ कारभार पुन्हा एकदा समोर आला आहे. ग्रामीण भागात कधी वेळेवर रुग्णवाहिका नसल्याने तर कधी रस्ता खराब असल्याने महिलांची रस्त्यात प्रसूती झाल्याच्या घटना घडल्या आहेत. तर त्र्यंबकेश्वर तालुक्यातील अंजनेरी प्राथमिक आरोग्य केंद्रावर यशोदा आणि तिची आई गेली असता आरोग्य अधिकारी आणि कर्मचारी नसल्याने आईलाच मुलीची प्रसूती करावी लागल्याचं म्हटलं जातं आहे.  

महिला आयोग आणि जिल्हा परिषदेने दिले चौकशीचे आदेश

घडलेल्या घटनेची महिला आयोग आणि जिल्हा परिषदेने गंभीर दखल घेतली आहे. जिल्हा परिषदेने घटनेची चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. तर महिला आयोगाने चौकशी होई पर्यंत संबधित अधिकाऱ्यांना निलंबित करण्याचे आदेश दिले आहेत.

Tags: