अमर काणे, झी मीडिया, नागपूर: सध्या चोरीचे प्रकार (crime news) सगळीकडेच वाढू लागले आहेत. त्यामुळे नागरिकांनी आता अधिक सावधगिरी बाळगण्याची गरज निर्माण झाली आहे. सध्या असाच एका धक्कादायक प्रकार (shocking news) समोर आला आहे. वाळू तस्करांनी राज्य शासनाला कोणताही कर न भरता कोट्यवधींची वाळू चोरलीच नाही. तर विकासकामांच्या नावाखाली पुन्हा ती शासनाच्या वेगवेगळ्या विभागांना विकली असल्याचं नागपूर पोलीसांच्या तपासात (police investigation) पुढे आले आहे. धक्कादायक बाब म्हणजे गेल्या वर्षभरात वाळू चोरीचा आकडा 40 हजार ब्रास म्हणजेच 8 हजार ट्रक एवढा आहे. मध्यप्रदेश आणि विदर्भातील अनेक नद्यांमध्ये वाळूचे साठा आहे आणि हीच वाळू सध्या वाळू तस्करांसाठी सोन्याची खाण बनली आहे. विदर्भातील खासकरून नागपूर शहराच्या अवतीभोवतीच्या (river) नद्यांतून गेले वर्ष दीड वर्ष जोरात वाळू उत्खनन झाले. वाळू घाट सरकारने लिलाव केले होते तिथून बोगस रॉयल्टीचे आधारावर (sand news nagpur) वाळू चोरी झाली. तर ज्या घाटाचे लिलाव झालेले नाही, तिथून सुद्धा चोरट्या पद्धतीने वाळूचे उत्खनन करण्यात येते. (A shocking case of stealing crores worth of sand and selling it again to different departments of the government in the name of development works)
एवढ्या मोठ्या प्रमाणावर निर्माण कार्य होत नसताना एवढी चोरीची वाळू कुठे खपवली जात असेल असा प्रश्न निर्माण होणे स्वाभाविक आहे तर पोलीस तपासात धक्कादायक वास्तव पुढे आले आहे. वाळू तस्करांनी चोरीची ही वाळू वेगवेगळ्या सरकारी विभागांच्याच माथी मारली आहे. म्हणजेच शासनाची वाळू चोरून शासनालाच (govenment) विकल्याचा पराक्रम वाळू तस्करांनी केला आहे. पोलिसांच्या तपासानुसार सार्वजनिक बांधकाम विभाग, जलसंधारण विभाग, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण, रेल्वे, मॅग्नीज ओर इंडिया लिमिटेड (national highways) अशा शासनाच्या विविध विभागांना चोरीची वाळू विकण्यात आल्याचे समोर आले आहे.
शासन आणि प्रशासनाला फसवण्यासाठी वाळू तस्कर नेहमीच नवनवीन युक्ती शोधत असतात नागपुरात घडलेल्या प्रकारामध्ये वाळू तस्करांची एक अफलातून युक्ती समोर आली आहे. नागपूर जिल्ह्यातील कुठल्याही नदीपात्रातून रीतसर अर्ज करून रॉयल्टी भरून वाळू उचलायची. मात्र रॉयल्टीच्या पावतीवर त्याचा पुरवठ्याचा ठिकाण म्हणजेच डेस्टिनेशन नागपूर (Nagpur) ऐवजी नागापूर" (Nagapur) टाकायचं. वाशिम जिल्ह्याचा "नागापूर" नागपूर जिल्ह्यातील कुठल्याही वाळू घाटापासून किमान तीनशे किलोमीटर लांब पडतो. म्हणजेच तिथे वाळू पुरवठ्यासाठी 14 ते 15 तासांचा वेळ वाळू तस्करांना मिळतो मात्र ती वाळू नागापूरला न नेता नागपूरलाच पुरवली जाते आणि 14 ते 15 तासाच्या वाढीव कालावधी मिळतो. त्यात अनेक फेऱ्या मारल्या जातात, याचाच फायंदा घेत पहिली फेरी नियमानुसार आणि उर्वरित सात ते आठ फेऱ्या अवैधरित्या मारल्या जातात आणि अशा तऱ्हेने शासनाला कोट्यवधी रुपयांचा चुना लावला जातो.
हेही वाचा - पत्नीकडे पाहू नको बोलल्याचा राग मनात धरत तो थेट घरात शिरला अन्... थराराक घटना
नागपूर पोलिसांनी आतापर्यंत वाळू चोरीच्या या वेगवेगळ्या प्रकरणांमध्ये चार स्वतंत्र (crime news nagpur) गुन्हे दाखल केले आहे. त्यामध्ये 65 पेक्षा जास्त वाळू तस्करांना आरोपी बनवण्यात आले आहे. दरम्यान वाळूचे अवैध उत्खनन आणि नंतर चोरटी वाहतूकीतून निर्माण होणारे कोट्यवधी रुपये जातात तरी कुठे हे शोधण्यासाठी नागपूर पोलिसांनी सर्व आर्थिक व्यवहारांचे फॉरेन्सिक ऑडिट सुरू केले आहे.