Sambhaji Chhatrapati on Governor Bhagat Singh Koshyari : छत्रपती शिवाजी महाराज (Chhatrapati Shivaji Maharaj) यांच्याबाबत वादग्रस्त वक्तव्य राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Governor Bhagat Singh Koshyari) यांनी केले. यावरुन मोठा वाद निर्माण झालाय. शिवभक्तांच्या भावना समजत नसतील तर उठाव होणारच, असे संभाजीराजे छत्रपती यांनी म्हटले आहे. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्यावर अजून कारवाई का झाली नाही, याचा अर्थ राज्यपालांच्या विधानाशी राज्यकर्ते सहमत आहेत का, असा सवाल संभाजीराजे यांनी विचारला आहे. तर संभाजी राजे यांची भावना ही महाराष्ट्राची भावना आहे, असं म्हणत ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी संभाजीराजे यांच्या वक्तव्याला समर्थन दिले आहे.
संभाजीराजे यांनी ट्विट करताना म्हटलंय, भगतसिंग कोश्यारींवर अजूनही कोणती कारवाई झालेली नाही. कारवाई होत नाही याचा अर्थ त्यांनी केलेल्या विधानांशी राज्यकर्ते सहमत आहेत का? महाराष्ट्राच्या जनतेला कुणीही गृहीत धरु नये. शिवभक्तांच्या भावना सरकारला समजत नसतील तर उठाव होणारच! #कोश्यारी_हटाओ, असा हॅशटॅगही यावेळी त्यांनी वापरला आहे.
दरम्यान, महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराज (Chhatrapati Shivaji Maharaj) यांच्याबाबत वादग्रस्त वक्तव्य केल्यानंतर राज्यात तीव्र संताप व्यक्त होत आहे. छत्रपती शिवाजी महाराज आणि महापुरूषांबद्दल अवमानकारक विधाने करणारे भगतसिंह कोश्यारी यांना राष्ट्रपती महोदया आणि पंतप्रधान यांनी तात्काळ महाराष्ट्राच्या राज्यपाल पदावरुन हटवावे, अशी मागणी संभाजीराजे छत्रपती यांनी केली होती. त्यानंतर त्यांच्यावर कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही. त्यानंतर पुन्हा एकदा संभाजीराजे छत्रपती यांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. जर कारवाई होणार नसेल तर उठाव हा होणारच, हे लक्षात घ्या, असा थेट इशारा संभाजीराजे छत्रपती यांनी दिला आहे.
भगतसिंग कोश्यारी यांच्यावर अजूनही कोणती कारवाई झालेली नाही. कारवाई होत नाही याचा अर्थ त्यांनी केलेल्या विधानांशी राज्यकर्ते सहमत आहेत का ? महाराष्ट्राच्या जनतेला कुणीही गृहीत धरू नये. शिवभक्तांच्या भावना सरकारला समजत नसतील तर उठाव होणारच !#कोश्यारी_हटाओ
— Sambhaji Chhatrapati (@YuvrajSambhaji) November 27, 2022
राज्यपाल कोश्यारी यांची नियुक्ती झाल्यानंतर सातत्याने महाराष्ट्र राज्य आणि महापुरुषांच्याबाबत वादग्रस्त आणि अपमानास्पद विधाने करीत आहेत. त्यामुळे राज्यातील सामाजिक आणि शांततेस बाधा पोहोचेल असे वर्तन त्यांच्याकडून होत आहे. त्यामुळे त्यांच्यावर कारवाई होणे आवश्यक आहे, असे पत्रच त्यांनी राष्ट्रपती आणि पंतप्रधान मोदी यांना लिहिले आहे. तसे त्यांनी ट्विट केलेय.