Sad Story: पत्नीचं दु:ख पचवता आलं नाही, निराश पोलीस कर्मचाऱ्याने आयुष्याचा केला शेवट

Nagpur News: आपल्या आयुष्यात असे अनेक कठीण प्रसंग घडत असतात. त्यावर काही जण मात करतात तर काही जणांना अशा प्रसंगात हार येते. सध्या असाच एक प्रकार नागपूरमध्ये (nagpur news) घडला आहे.

Updated: Dec 18, 2022, 02:15 PM IST
Sad Story: पत्नीचं दु:ख पचवता आलं नाही, निराश पोलीस कर्मचाऱ्याने आयुष्याचा केला शेवट  title=
nagpur news

अमर काणे, झी मीडिया, नागपूर: आपल्या आयुष्यात असे अनेक कठीण प्रसंग घडत असतात. त्यावर काही जण मात करतात तर काही जणांना अशा प्रसंगात हार येते. सध्या असाच एक प्रकार नागपूरमध्ये (nagpur news) घडला आहे. पत्नीचे निधन (wife death) झाल्यामुळे गेल्या वर्षभरापासून नैराश्येत (depression) असलेल्या पोलीस शिपायाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना नागपुरात घडली आहे. संतोष वानखेडे असे आत्महत्या करणाऱ्या शिपायाचे नाव आहे. ते बेलतरोडी पोलीस स्टेशनमध्ये (police dies of depression) कार्यरत होते. संतोष यांच्या पत्नीचे गेल्या वर्षी एका आजारामुळे निधन झाले. पत्नीच्या निधनापासून संतोष नैराश्यात होते. त्यांना बारा वर्षाचा मुलगा असून तो त्यांच्या आई-वडिलांकडे यवतमाळ येथे राहतो. संतोष हे एकटेच रघुजी नगर पोलीस कवॉटर्समध्ये राहायचे. (a police officer dies after wife death and facing depression)

शनिवारी ते ड्युटीवर हजर न राहिल्याने बेलतरोडी ठाण्याच्या (police news) कर्मचाऱ्यांनी त्यांच्या शेजाऱ्यांशी संपर्क साधला. त्यावेळी संतोष घरीच गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळले. या प्रकारानं परिसरात खळबळ माजली आहे. सदर प्रकारामुळे पुन्हा एकदा नैराश्य आणि मानवापुढील त्याची आव्हानं याचा मुद्दा पुन्हा पुढे आला आहे. त्यातून पोलीस आणि त्यांच्या जीवनात येणाऱ्या नैराश्यमुळे सध्या पोलिसांच्या मानसिक आरोग्याचाही (mental health) प्रश्न ऐरणीवर आला आहे. पोलिस कर्मचाऱ्याच्या अशा हतबलतेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली आहे.  

सध्या नैराश्याचा मुद्दा हा ऐरणीवर आला आहे. करोनाच्या काळातही अनेकांना नैराश्यानं ग्रासले होते. आपल्या नातेवाईकांच्या आणि जवळच्या व्यक्ती निधनानंही अनेकांना नैराश्याला समाेरे जावे लागले होते. त्यातील अनेकांनी नैराश्यचा सामनाही केला परंतु काहींना अपयशही आले. सध्या करोनाच्या काळानंतरही अनेकांना नैराश्यानं ग्रासलं आहे. त्यातून तरूणांमध्ये नैराश्याचे प्रमाण अधिक वाढताना दिसते आहे. नोकरी करणारे तरूण तसेच महाविद्यालयीन (depression and youngsters) तरूणांमध्ये डिप्रेशनचं प्रमाण वाढू लागलं आहे. यासाठी कॉलेजमध्ये आणि ऑफिसेसमध्ये मानसिक आरोग्य केंद्रही स्थापन करण्यात आली आहेत. याचा फायदाही अनेकांना होतो आहे. जवळच्या व्यक्तीच्या मृत्यूमुळे आपल्याला नैराश्य येणं, दु:खी होणं नैसर्गिक आहे. परंतु यातून कोणी टोकाचं पाऊल उचलतं असेल तर त्यांना मदत करणेही आवश्यक आहे. 

हेही वाचा - मटणाचा रस्सा अन् पोलिसांनाच मारहाण! नेमकं काय प्रकरण आहे? जाणून घ्या

नैराश्यावर करा मात : 

तुम्हाला जर का नैराश्यानं ग्रासलं असेल तर वेळीच त्यावर जवळच्या मानसिक आरोग्य केंद्रात भेट द्या. शारिरिक आरोग्याबरोबर मानसिक आरोग्यही महत्त्वाचे आहे. त्यामुळे यावरही वेळीच उपचार करणे आवश्यक आहे. तुमच्या आजूबाजूला असा कोणी पेशंट आढळला तर त्याच्याशी बोला आणि त्यांना मदत करा. त्यामुळे आपण कोणाचा तरी जीव वाचवू शकतो.