नविन बाईकवरुन फिरणाऱ्या नवरा-बायकोसह घडली भयानक घटना; अचानक बाईक पेटली आणि....

पती-पत्नी बाईकने जात असताना अचानक मोटरसायकलला आग लागली. आग इतकी तीव्र होती की थोड्यावेळातच आगीने रुद्ररूप धारण केले. 

Updated: Nov 10, 2022, 07:56 PM IST
 नविन बाईकवरुन फिरणाऱ्या नवरा-बायकोसह घडली भयानक घटना; अचानक बाईक पेटली आणि.... title=

प्रविण तांडेकर, गोंदिया, झी मीडिया : गोंदियामध्ये(Gondia) नविन बाईकवरुन फिरणाऱ्या नवरा-बायकोला भयानक अनुभव आला आहे. बाईक वरुन जात असताना बाईकने अचानक पेट घेतला(bike suddenly caught fire). या  घटनेतून नवरा-बायको थोडक्यात बचावले आहेत. विशेष म्हणजे यांनी ही बाईक दहा दिवसांपूर्वीच विकत घेतली होती. नविन बाईकने पेट घेतल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. 

गोंदिया शहरातील परमात्मा एक नगर येथे ही घटना घडली.  पती-पत्नी बाईकने जात असताना अचानक मोटरसायकलला आग लागली. आग इतकी तीव्र होती की थोड्यावेळातच आगीने रुद्ररूप धारण केले. 

बाईक आगीत जळून खाक

बाईक पेटल्याचे लक्षात येताच मोटरसायकल चालकाने तात्काळ बाईक थांबवली. पत्नीला बाईकवरुन खाली उतरवले. यानंतर स्वत: बाईकवरुन उतरत बाईक फेकून  दिली. त्यामुळे पती पत्नी थोडक्यात बचावले आहेत. बाईक पेटल्याचे दिसताच स्थानिक यांच्या मदतीसाठी धावून आले. पाण्याच्या मारा करुन आग आटोक्यात आणली गेली. मात्र, तो पर्यंत दुचाकी जळून खाक झाली होती.

विशेष म्हणजे दहा दिवसापूर्वींच त्यांनी ही बाईक विकत घेतली होती. तर, शॉर्ट सर्किटमुळे ही बाईक पेटल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.