पराग ढोबळे, झी मीडिया, नागपूर: बिबट्याच्या हल्ल्यानं अनेकदा परिसरात खळबळ पसरते. सध्या अशाच एका बातमीनं सगळीकडे खळबळ माजली आहे. एका बिबट्यानं (Leopard) सुरक्षा रक्षकावर हल्ला चढवला आहे. आणि त्यामुळे पुन्हा एकदा सुरक्षेततेचा प्रश्न उपस्थित झाला आहे. (a leopard attack on a security guard from private hospital rushes to the hospital)
नागपूर ते वर्धा मार्गावर शहराबाहेर खाजगी हॉस्पिटलच्या (Private Hospital near me) सुरक्षा रक्षकावर अपघातात जखमी बिबट्याने हल्ला केलाय. आज सकाळी जामठा (Jamatha) स्टेडियम परिसरात बिबट्यानं सुरक्षा रक्षकावर हल्ला केल्यान ही घटना उघडकीस आलीय. या हल्ल्यात जखमी झालेल्या सुरक्षा रक्षकावर उपचार सुरू आहे. तेच जखमी बिबट्याला त्याच परिसरात ट्रँक्युलाईज करून रेस्क्यू करत ट्रान्झिट ट्रिटमेंट सेंटरला नेण्यात आल आहे.
मित्रानेच केला घात! जिगरी दोस्ताचा अश्लील व्हिडीओ बनवत त्याने... पुण्यातील घटना!
या बिबट्याच्या मागच्या पायाला दुखापत झाली असल्यानं वाहनांच्या धडकेत अपघात झाला असावा असा अंदाज लावला जात आहे. तेच रस्ता ओलांडताना बिबट्यानं सुरक्षा रक्षकावर हल्ला केल्याचे बोलले जात आहे. शहराबाहेर असलेल्या खाजगी हॉस्पिटलमध्ये सुरक्षा रक्षक कार्यरत (Security Gard) असलेल्या रुग्णालयात उपचार सुरू आहेय. वन विभागान आणि माजी राज्य मानद वन्यजीव सदस्य कुंदन हाते यांनी ट्रान्झिट ट्रीटमेंट सेंटरवर नेऊन वैदकीय तज्ज्ञांच्या मार्गदर्शनात उपचार सुरू केला आहे.
सध्या वारंवार होणाऱ्या बिबट्यांच्या हल्ल्यावरून आता सुरक्षितेतचा प्रश्न उपस्थित झाला आहे. त्यामुळे सध्या अशा प्रकरणांना आळा घालणं अनिवार्य झालं आहे. मध्यंतरी अशा अनेक घटनासमोर आल्या होत्या ज्यावरून बिबट्याच्या हल्ल्यावरून पुन्हा एकदा सुरक्षिततेचा प्रश्न उपस्थित झाला आहे. बिबट्या घरात घुसणं, कधी सोसयटी (Leopard in House) तर कधी स्वयंपाक घरात घुसण्याचे प्रमाणही वाढले आहे.